Breaking News
Home / बातम्या / गरुड पुराणानुसार अशा गुणांच्या स्त्रिया असतात खूप भाग्यवान, घराला बनवतात स्वर्ग..

गरुड पुराणानुसार अशा गुणांच्या स्त्रिया असतात खूप भाग्यवान, घराला बनवतात स्वर्ग..

पूर्वीपासून आपली संस्कृती हि पुरुषप्रधान मानली जाते. परंतु आपल्या समाजामध्ये स्त्रीलाही तितकेच महत्वाचे आणि आदराचे स्थान आहे. स्त्री हि आपल्या कुटुंबातील एक प्रमुख दुवा मानली जाते. कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्रित बांधून ठेवण्याचे काम स्त्री करत असते.

आपल्या धा र्मिक ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये मनुष्याच्या जीवनाशी संबंधित असलेल्या बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला आहे, प्रत्येक मनुष्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्याच्या जीवनाशी संबंधित बऱ्याच गोष्टींचा उल्लेख शास्त्रात केला गेला आहे. स्त्रियांशी संबंधित खूप गोष्टींचा उल्लेख आपल्याला शास्त्रामध्ये आढळतो.

जसे कि तुम्हाला माहिती आहेत कि हिंदू ध र्मामध्ये पती पत्नीचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. हे दोघे एकमेकांसाठी पूरक असतात. जर आपल्याला पत्नीचा शब्दशः अर्थ सांगायचा झाला तर तो म्हणजे अर्धांगिनी म्हणजेच पतीचे अर्धे अंग. म्हणून पत्नी हि अर्धांगिनी म्हणूनही ओळखली जाते. एक स्त्री संपूर्ण घराची देखभाल करते आणि सर्व गोष्टी व्यवस्थित रीतीने करते.

पत्नीच्या गुणांबद्दल आणि तिच्या व्यवहाराबद्दल शास्त्रामध्ये विस्तारित उल्लेख केला गेला आहे. स्त्रीपासूनच वंशवेल वाढते आणि स्त्रीच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण करते.

आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून गरुड पुराण नुसार पत्नींचे असे काही गुण सांगणार आहोत जे एखाद्या स्त्रीमध्ये असतील तर तिला खूप भाग्यशाली मानले जाते. अशा प्रकारची स्त्री ज्या घरामध्ये जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते. याप्रकारच्या स्त्रिया भूप भाग्यशाली मानल्या जातात.

चला जाऊन घेऊयात या गुणांबद्दल : स्त्रियांमध्ये सर्व ग्रहांचे संचालन करण्याची गुणवत्ता असली पाहीजे, घर कसे चालवावे, सर्वकाही व्यवस्थित कसे करावे आणि आपली जबाबदारी समजून घेणे हा महिलांचा विशेष गुण मानला जातो. जर हा गुण ज्या स्त्रीमध्ये असेल तर ती स्त्री त्या घराला नंदनवन बनवू शकते. त्याचबरोबर स्त्रियांना घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचा आदर सत्कार करता आला पाहिजे.

Loading...

ज्या घरामध्ये पत्नी आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करते, त्या घरामध्ये खुशहाली कायम राहते. जर एखादी स्त्री घरातील कोणत्याही व्यक्तीच्या आज्ञेचे पालन करत नाही आणि घरातील कुटुंबीयांसोबत वादविवाद करते, या कारणामुळे घरामध्ये अडचणी उद्भवतात. म्हणून ज्या स्त्रिया फक्त आपल्या घराबद्दल आणि कुटुंबाबद्दल विचार करतात आणि आपल्या पतीवर प्रेम करतात अशा स्त्रिया घर परिवारासाठी अतिशय शुभ मानल्या जातात.

ज्या स्त्रिया नियमित पूजा पाठ करतात, स्नान केल्यानंतरही स्वयंपाक बनवतात किंवा वाढायला घेतात. त्यांचे हे गुण त्यांना अधिक गुणवान बनवतात. यामुळे घरामध्ये सुख शांती, वैभव, येते. घराची प्रगती जलद होते.

गरुड पुराणानुसार, ज्या स्त्रिया नेहमी आपल्या ध र्माचे योग्यप्रकारे पालन करतात, अशा स्त्रिया नेहमी खूप गुणवान मानल्या जातात. ज्या महिलेचा स्वभाव गोड असतो आणि ती कधीही कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी बोलताना चुकीचे शब्द वापरत नाही आणि आपल्या कुटुंबाला आणि पतीला दुख देत नाही अशा महिला घरासाठी खूप भाग्यवान असतात.

अशा महिला ज्या घरामध्ये जातात त्या घरातील कुटुंबाचे भाग्य खुलून जाते. आणि त्या घरामध्ये पैशाची कधीच कमी जाणवत नाही. अशा घरामध्ये सर्व कुटुंबीय नेहमी समन्वयाने राहतात.

Loading...

About admin

Check Also

टीव्ही इंडस्ट्रीच्या या प्रसिद्ध अभिनेत्री आता लग्न करणार नाहीत. एक तर 46 व्या वर्षीची कुमारिका आहे.

प्रत्येकाच्या जीवनात विवाह महत्त्वपूर्ण स्थान आहे. आयुष्यात एक महत्त्वपूर्ण वळण येते जेव्हा एखाद्या व्यक्तीस लग्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *