Breaking News
Home / बातम्या / प्रत्येक अपयश माणसाला आधिकाअधिक मजबुत बनवत जातं थेट पंकज कोटलवार यांच्या लेखणीतून..

प्रत्येक अपयश माणसाला आधिकाअधिक मजबुत बनवत जातं थेट पंकज कोटलवार यांच्या लेखणीतून..

मित्रांनो लोहगावमधल्या डि. वाय. पाटील आर्किटेक्चर कॉलेजमध्ये एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर ह्या विषयामध्ये सध्या माझं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरु आहे. ह्या कॉलेजमध्ये खुप टॅलेंटेड लोकं शिकवतात त्यातही मला गुरु म्हणुन लाभलेले एकेक टिचर तर अगदी जबरदस्त आहेत अगदी एकेकाला व्यक्ती आणि वल्ली असा पुरस्कार देऊन सन्मानित करावे इतके आपापल्या क्षेत्रात अभ्यासु कर्तबगार आणि प्रचंड बुद्धिमान आहेत.

प्रत्येक सेमीस्टरमध्ये आम्हाला एक लुटुपुटीचं खोटं खोटं घर बनवावं लागतं त्यासाठी काश्मिर पासुन अंदमान पर्यंत अख्ख्या भारतातली कोणत्याही शहरातील साईट निवडण्याची मोकळीक असते मी निवडलं सुदुर ईशान्य भारताच्या डोंगररांगामध्ये हिरव्या गर्द वनराईत लपलेलं नागालॅंडच्या राजधानीचं शहर कोहीमा . अभ्यास करताना मला लक्षात आलं की टेकडीच्या शिखरावर वसलेल्या शहरांना भुकंपाचा धोका असतो जेव्हा मी हे माझ्या मॅमला सांगितलं त्यावर जे काही सहजच बोलुन गेल्या ते ऐकुन मला आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्काच बसला.

त्या जे काही इंग्लिशमध्ये म्हणाल्या त्याचा मराठी सारांश असा काही होता हे बघ पंकज निसर्ग आपली आई आहे आणि प्रत्येक आईला आपल्या बालकांची चिंता असते. अगदी तसंच प्रत्येक जमिनीलाही तिथल्या माणसांची चिंता असतेच असते हे खरं आहे की उंच शिखरांच्या टेकड्यांवर समुद्रसपाटीपासुन उंच उंच असलेल्या डोंगरांवर भुकंप येतात पण त्यावर असलेला उपायही त्या डोंगरांमध्येच लपलेला आहे.

अशा घाटमाथ्यावर विपुल प्रमाणात पाऊस पडतो आणि इथे मुबलक प्रमाणात बांबुची झाडं उगवतात म्हणजे अप्रत्यक्षरित्या निसर्गच आपल्याला सुचवतोय की बाबारे . तुला इथं भुकंपापासुन जीवाचा धोका आहे पण तु मी उपलब्ध करुन दिलेल्या बांबुची लाईटवेट हलकीफुलकी घरं बांधुन राहीलास तर तुला भुकंपाचा काहीच त्रास होणार नाही. निसर्ग आपली सोय करतो रे . फक्त आपलं तिकडं लक्ष नसतं .

अजुन एक उदाहरण घे राजस्थानमध्ये रणरणतं उन्ह असतं मे महिन्यात तर सुर्य आग ओकतो अंगाची जिवाची काहीली काहिली होते x अशा अतिउष्ण झळांपासुन माणसाचं संरक्षण करण्यासाठी निसर्गरुपी आईने आपल्या उदरात दगड तयार केला मार्बल संगमरवर ढोलपुरी जैसलमेर अशी सुबक देखणी आणि रंगबेरंगी दगडांच्या खाणीच्या खाणी आहेत राजस्थानमध्ये . ह्या दगडांचा वापर करुन तिथला लोकल माणुस वर्षानुवर्ष अशा पद्धतीची घरं बांधत राहीला की कडक उन्हाळ्यामध्ये देखील सारी उष्णता त्या घरात वापरलेले दगड शोषुन घेतील आणि माणसाला मात्र गारवा मिळेल . ..

हवेच्या मानाने हा दगड अगदी हळुहळु तापतो . कर्नाटक आंध्रामध्येही निसर्गाचं असंच गंमतीशीर समीकरण आहे वातावरण जितकं उष्ण तितक्या जास्त काळाकुट्ट ग्रॅनाईट कडप्पा शाहबाद फरशी आणि कोट्टा स्टोनच्या खाणी सोलापुरहुन बेंगलोरला जाताना शहाबादवाडी कडप्पा मंत्रालयम रोड आणि सेडम अशी टुमदार गावं लागतात ह्या शहरांना जोडणारी अनेक छोटीमोठी खेडेगावं आहेत जिथे आजही घरांच्या भिंती बांधण्यासाठी लाल विट वापरली जात नाही

ह्या दिसायला कणखर पण फोडायला ठिसुळ असलेल्या दगडांची जाडजुड भिंत बांधुनच घरी बांधली जातात जी अतिशय देखणी स्वस्त आणि त्याचवेळी तापमानाला नियंत्रित करणारी असतात थोडक्यात काय तर निसर्ग स्वतःचं आपल्याला भेडसावणार्‍या समस्यांची आपल्यापुढे आ वासुन उभ्या असलेल्या प्रश्णांची उत्तरे आपल्यापुढे रहस्यमयी स्वरुपात लपवुन ठेवतो.

Loading...

प्रश्ण इतकाच आहे की त्या जटिल प्रश्णांवरची उत्तरे हुडकण्याची ती लपवुन ठेवलेली वरदाने शोधण्याची त्या माणसाची कुवत किंवा लायकी आहे का? अगदी गप्पा माराव्यात अशा सहजतेनं कसल्याही विद्वत्तेचा आव न आणता त्या बोलत राहील्या हे असं काही मी आयुष्यात प्रथमच ऐकत होतो आणि माझ्या डोक्यातल्या विचारांना एखादी अलिबाबाची गुफा सापडावी अशी काहीशी माझी स्थिती झाली

माझ्या मनात विचारांचा एकच कल्लोळ उठला हे किती जबरदस्त आणि साधं सोपं पण अतिशय उपयुक्त सुत्र आहे यार …. जो आपल्यासमोर प्रश्ण निर्माण करुन ठेवतो त्याची उत्तरं त्याने आधीच तयार करुन आणि अवतीभवती दडवुन ठेवली आहेत लपवुन ठेवली आहेत. हे सुत्र अनेक यशस्वी माणसांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने जगापुढे मांडलं आहे हे मी आगोदरसुद्धा ऐकलं होतं त्याचा अनेकवार वापरसुद्धा केला होता

पण काल एका नव्या रंगात ते ठळकपणे समोर येऊन हात जोडुन उभं राहीलं आणि युरेका युरेका असं म्हणत पळत सुटायचा मोह झाला इतका आनंद झाला जसं एखादा घातक साप चावला की त्यावरचं रामबाण आणि एकमेव औषध म्हणजे त्याच सापाचं विष असतं अगदी तसंच प्रत्येक समस्येच्या गर्भातच त्या समस्येची उकल लपलेली असते.प्रत्येक अपयश माणसाला आधिकाअधिक मजबुत बनवत जातं कधी काळी वाईट वाईट दिवस सोसलेले द्रारिद्र्याचे चटके घेतलेले लोकंच झर्र्कन दमदार वेगाने यशाच्या पायर्‍या चढत चढत वर जातात ज्याच्या शरीरात एकेक रोग हळुहळु घुसखोरी करण्याची चाहुल देतात तोच माणुस इतरांपेक्षा कित्येक पट अधिक हेल्थ कॉन्शिअस होतो.

जी व्यक्ती स्वतःला कुरूप मानते तीच व्यक्ती खटपटी करून स्वतःचं व्यक्तिमत्त्व एवढं आकर्षक एवढं चुंबकीय व्यक्तिमत्व बनवते की की भविष्यात त्याच व्यक्तीकडे अनेक लोक आपोआप आकर्षित होतात ज्याला व्यवहारात किंवा प्रेमात वाईट पद्धतीने धोका मिळालेला असतो किंवा पाठीत खंजीर खुपसल्याने त्याचा विश्वासघात झालेला असतो तोच माणुस पुढे वाट्याला आलेला एकेक धक्का पचवुन अतिशय व्यवहारचतुर बनतो आणि मैदान गाजवतो.आपत्तीचं इष्टापत्तीमध्ये अपयशाचं सोहळ्यामध्ये आणि वेदनांचं आनंदलहरींमध्ये रुपांतर करण्याची ही कलाच माणसाला खर्‍या अर्थाने जगवते जिवंत ठेवते

आयुष्यावर प्रेम करायला भाग पाडते तुमचेही काही अनुभव असतील तर अवश्य सांगा लेख आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आभार आणि शुभेच्छा ….

Loading...

About admin

Check Also

टीव्ही इंडस्ट्रीच्या या प्रसिद्ध अभिनेत्री आता लग्न करणार नाहीत. एक तर 46 व्या वर्षीची कुमारिका आहे.

प्रत्येकाच्या जीवनात विवाह महत्त्वपूर्ण स्थान आहे. आयुष्यात एक महत्त्वपूर्ण वळण येते जेव्हा एखाद्या व्यक्तीस लग्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *