एका रात्रीत कामवालीच्या जीवनाला मिळाली कलाटणी, घरकामे सोडून सुरु केले मॉडेलिंग. .

माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. रातोरात एखादा गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो किंवा श्रीमंत माणूस गरीब. म्हणतात ना देव देतो तेव्हा छप्पर फाडूनसुद्धा देतो. असाच एक किस्सा घडला आहे एका कामवालीच्या बाबतीत. एका रात्रीत ती मॉडेल बनली आणि घरकामे तिने सोडून दिली. तिच्या आयुष्याला अचानकपणे एक वेगळेच वळण लागले.

सौंदर्यहे चेहऱ्यात नसून पाहणार्याच्या मनात असतं. तुमचे डोळे किंवा रंग ही सौंदर्याची परीभाषा नसून तुम्ही कसे वागता बोलता यावर तुमचे सौंदर्य ठरत असते. तुम्ही स्वतःला कसे पेश करता हे जास्त महत्वाचे आहे. मग एखादी स्त्री जात्या सुंदर नसेल पण स्वतःला उत्तम पेश करत असेल तर तिचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही. असेच काहीसे कमलाच्या बाबतीत घडले. एका फेशन डिझायनरची तिच्यावर नजर पडली आणि तिचे आयुष्यच पालटून गेले.

झालेअसे कि कमला रोजच्याप्रमाणे तिच्या कामाला गेली असताना शेजारील एका बाईने तिला पाहिले. मनदीप नेगी असे तिचे नाव असून तिचे ‘ शेड्स ऑफ इंडिया’ कलेक्शन खूप भारी प्रसिद्ध झाले होते. तिच्या कलेक्शनसाठी एक फ्रेश चेहऱ्याच्या शोधात ती होती, अशातच तिची नजर कमलावर पडली. कमला साधी असली तरी नीटनेटकी व आकर्षक होती. तिला असे लोक हवे होते जे पेशाने मॉडेल नसतील. कमलाला पाहून तिला वाटले कि योग्य तो चेहरा तिला सापडला आहे.

तिने मग कमलाला मॉडेलिंग ची ऑफर दिली. सुरुवातीला कमलाला विश्वासच बसला नाही. पण मग नंतर तिने होकार दिला. त्यानंतर तिचा योग्य तो मेकओवर केला गेला. त्यांनतर जे घडले ते पाहून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटले. मॉडेल म्हणून कमला खूपच आकर्षक दिसत होती. खास गोष्ट अशी कि तिने सगळ्या प्रकारचे उत्तम कपडे घातले. तिच्या प्रत्येक फोटोत एक साधेपणा आणि तिचा आत्मविश्वास दिसून येत होता. तिच्या या मेकओवरची चर्चा सगळीकडे होऊ लागली.

कमलालापाहून आपण हे नक्कीच म्हणू शकतो की प्रत्येक महिलेत सौंदर्य हे असतेच पण ते पारखण्यासाठी योग्य ती दृष्टी हवी. जर तुम्ही चांगले कपडे घातलेत, ते घालताना आत्मविश्वास बाळगलात आणि उत्तमरीत्या स्वतःला प्रेझेंट केलेत तर तुम्ही एक योग्य तो आदर्श सगळ्यांपुढे घालून देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *