मर्लिन मनरो: हॉलीवुडचा तो चेहरा ज्याची कहाणी खूप हृदयस्पर्शी आहे..

“जेव्हा मी पाच वर्षांची होते तेव्हा मला नायिका बनायचे होते. मला खेळाचीही खूप आवड होती. मी चित्रपट बघायला जायचे. मला ते फार आवडायचे”.१९६२ मध्ये लाईफ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हे सांगणारी होती मर्लिन मन्रो.

जिला लोक तिच्या प्रतिमेमुळे ओळखतात. १९५० मध्ये ब्लॉन्ड ब्यूटी ची जि संकल्पना बनली त्यात तिची प्रमुख भूमिका होती. तिचे खरे नाव नॉर्मा जीन मोर्टनसन होते. तिचा जन्म लॉस एंजलिसमध्ये झाला आणि तिची आई ग्लैडिस पर्ल बेकर हिने तिला फ़ॉस्टर पेरेंट्सबरोबर ठेवले. फ़ॉस्टर पेरेंट्स जे मुलांना वाढवतात, त्यांना कायद्याने दत्तक घेत नाहीत पण त्यांची नीट काळजी घेतात. तिची आई खूप आजारी असल्याने तिने हा निर्णय घेतला.

जिकडे ती राहात होती तिकडे तिचा खूप छळ होत होता. मग काही काळ ती तिच्या आईच्या जवळच्या मैत्रिणीबरोबर राहिली, मग ती मैत्रीण म्हणजेच ग्रेस गोडार्ड तिची गार्डियन झाली. नंतर तिने तिला काही काल अनाथाश्रमात ठेवले पण तिकडे तिला खूप वाईट अनुभव आला. मग ग्रेस तिला घरी घेऊन आली. ग्रेस च्या पतीने तिचे शारीरिक शोषण केले. म्हणून ती वर्जीनिया येथे गेली. मग तिने शेजारी जिम डोअर्टी याच्याशी समझोता विवाह केला.

तिचे पती मर्चंट नेवि येथे होते. तिला एकटे वाटायचे मग तिने सासरी राहायला सुरुवात केली.तिकडे तिने एक नोकरी सुरु केली आणि त्यानंतर तिला सिनेमात जावेसे वाटले. तिने घटस्फोट घेतला. तिथेच नॉर्माची मर्लिन झाली. मर्लिन यासाठी कि मर्लिन मिलर नावाच्या ब्रॉडवे स्टारने १९२० आणि ३० च्या दशकात खूप माव मिळविले होते. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन मार्लिनचे नाव ठेवले गेले. मुन्रो यासाठी कि तिची आई लग्नाआधी मुन्रो हेल नाव लावत असे.

अशा प्रकारे नॉर्माची मन्रो झाली.ती सांगते, ‘जशी मी आहे ,तुमच्यासारख्या पुरुषांनी मला असेच बनवले आहे. जर तुमचे माझ्यावर थोडेजरी प्रेम असते तरी ज्या त्रासातून मी जाते आहे त्यांच्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटले असते. तुम्ही अशा प्रकारे माझा वापर केला नसता’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *