नोकरीचे कारण सांगून वेश्याघरात विकली गेली मुलगी, तिला वाचवण्यासाठी भावाने मित्राला पाठवले गिर्हाईक म्हणून.

नोकरीसाठी अनेक लोकान्न आपले शहर सोडून दुसरीकडे जावे लागते. लोक दुसरीकडे स्थायिक होतात, कधी आपणहून तर कधी दुसर्याच्या मदतीने. नोकरीसाठी दुसर्या ठिकाणी जाणे ह्यात काही विशेष नाही पण पश्चिम बंगालची सविता, (नाव बदललेले आहे) तिच्याबरोबर जे काही झाले ते भयानक आहे.

२७ वर्षीय सविताला एका महिलेने चांगल्या नोकरीची ऑफर देऊ केली. त्या बहाण्याने तिने तिला पश्चिम बंगालहून दिल्लीला पाठवले. तिने सविताला जीबी रोडच्या रेड लाईट एरियात विकून टाकले. सविताने हे तिच्या घरच्यांना कळवले. त्यानंतर तिच्या भावाने महिला आयोग आणि पोलिसांच्या मदतीने तिला सुरक्षित बाहेर काढले. त्या वेश्याघाराची संचालिका “मॉम” म्हणून नावाजलेली होती. तिचे खरे नाव माया असे आहे जिला पोलिसांनी अटक केली आहे.

तिला दिल्लीला पाठवल्यावर रंजन नावाच्या माणसाला तिला घेण्यास पाठवले. तो माणूस तिला काम देणार असे सांगितले. तो तिला एका खोलीत घेऊन आला. दोन दिवस तिला तिथेच ठेवले. मग तिसर्या दिवशी रंजन तिला जिब रोडलं कोठा ६८ येथे घेऊन गेला आणि म्हणाला इथेच काम करायचे आहे. सविताला समजत नव्हते कि ती कुठे आहे. जेव्हा गिर्हाईक येउ लागले तेव्हा समजले कि ती कोठ्यावर आहे आणि तिला विकले गेले आहे.


याच दरम्यान तिला एक बंगाली माणूस भेटला, त्याला तिने हिम्मत करून तिची सगळी कहाणी सांगितली. त्याला तिने तिच्या घरचा नंबरपण दिला. त्या माणसाने सविताच्या घरी फोन करून सगळे सांगितले. मग तिचा भाऊ दिल्लीला आला.
सविता घरातून निघून गेल्यानंतर तिच्या भावाने पोलिसात तक्रार दिली. मग २९ जून लं समजले की तिला कोठ्यावर विकले गेले आहे. तिचा भाऊ दिल्लीला लहान भावाबरोबर गेला. जिकडे तिला ठेवले होते तिकडे एका मित्राला त्याने पाठवले. त्याने स्वतः न जाता मित्राला पाठवले कारण भावाला पाहून ती भावूक झाली असती. तो तिला जाऊन भेटला तेव्हातिने सांगितले कि इकडून बाहेर पडण्यात धोका आहे. त्याने खूप ठिकाणी मदत मागितली पण काही उपयोग झाला नाही. म्हणून त्याने स्वतःच्या बळावर तिला तिकडून बाहेर काढण्याचे ठरवले.

मग त्याने नेट वर शोधले त्याला महीला आयोगाची माहिती मिळाली. तो त्यांच्याकडे गेला आणि सगळे सांगितले. त्यांनी सगळे लिहून घेऊन कागदपत्रे तयार केली. त्यांनी कमला मार्केटच्या पोलिसांना कळवले. पोलिसांनी छापे घातले. आणि ती वाचली. मग तिची वैद्यकीय तपासणी झाली. पोलिसांनी माया नावाच्या बाईला अटक केली. तीच या सगळ्याची सूत्रधार होती.


यासंदर्भात तिच्या वडिलांशीही बोलणे झाले. तिचे वडील सांगतात कि मुलगी एका महिन्यासाठी गेली होती. पण अजून परत आलेली नाही. चुकीच्या कामात ती फसवली गेली. आम्हाला वाटले ती चांगले काम करण्यासाठी जात आहे.दिल्ली महिला आयोग अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी या बाबतीतली माहिती ट्वीटर वरून दिली.
तर अशा प्रकारे मुलींना फसवून चुकीच्या ठिकाणी वापरले जाते. कामाची लालूच दाखवून त्यांना वाईट काम करण्यास प्रवृत्त केले जाते. त्या मुली इकडून पळून जाऊन स्वतःची सुटकाही करून घेऊ शकत नाहीत कारण त्यांच्या जीवाला धोका असतो. बरेचदा पोलीसही यात दखल देत नाहीत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *