स्वस्त पण उपयुक्त आहेत या वस्तू सोंदर्यप्रसाधना साठी, महागड्या प्रसाधानांपेक्षा खूप फायदेशीर एकदा जरूर वाचा.

जर तुम्हाला सुंदर दिसायचे असेल तर महागडी सौंदर्य प्रसाधने आणून त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य घालवण्यापेक्षा काही सोप्या घरगुती उपायांचा वापर करा. सौदर्य प्रसाधानामध्ये रसायने असतात जी त्वचेचे नैसर्गिक सौदर्य घालवतात. घर्गुती उपायांनी तुम्ही सहजतेने त्वचेला नैसर्गिक उजाळा देऊ शकता. पाहूया कसे ते.

१) मुलतानी माती:- मुलतानी माती, गुलाबजल, बेसन, चंदन पावडर एकत्र मिसळून हा लेप चेहर्याला लावल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येईल.

२) एलोवेरा जेल:- चेहरा आधी स्वच्छ धुवून घ्या, कोरडा करून त्यावर हे जेल लावा आणि हाताने हलकासा मसाज करा. रात्रभर तसेच ठेवून चेहरा सकाळी धुवून टाका. याने त्वचेला नैसर्गिक उजाळा येईल.

३) नीम  तेल:- हे तेल कापसावर घेऊन चेहर्याला लावून वीस मिनिटे ठेवा. मग कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. याने चेहरा सुंदर दिसेल.

४) चंदन:- चंदन पावडर आणि गुलाबजल मिसळून चेहर्याला लावा आणि काही वेळानंतर धुवून घ्या, याने चेहऱ्यावरील सुरुकुत्या नाहीशा होतील.

५) बदाम तेल:- बदामाचे तेल चेहर्यासाठी खूप उपयुक्त आहे. आठवड्यातून तन ते चार वेळा चेहर्याला लावल्यास चेहरा उजळून निघेल.

६) मध:- मधाने तुमच्या चेहर्याला नैसर्गिक उजाळा मिळतो. मधात लिंबाचा रस, चंदन पावडर आणि गुलाबजल मिसळून हा लेप चेहऱ्यास रोज लावल्यास खूप फायदा होतो.

७) हळद:- हळदीमध्ये खूप औषधी गुण आहेत. त्यात दही, चंदन पावडर आणि बेसन मिसळून नियमितपणे लावल्यास चेहर्याचा काळपटपणा दूर होईल.

८) नारळाचे तेल:- नियमितपणे चेहर्याला मसाज केल्यास त्वचेचा पोट सुधारेल.

९) बेसन:- चेहर्यासाठी खूप उपयुक्त असे बेसन आहे. यात लिंबूरस आणि मलई मिसळून लावल्यास खूप फायदा होतो.

१०) दालचीनी:-  एक चमचा दालचिनी पावडर आणि दोन चमचे मध मिसळून चेहर्याला तो लेप आठवड्यातून एकदा लावल्यास चेहरा सुंदर दिसू लागेल. दालचिनीने त्वचेला खाज येऊ शकते म्हणून आधी टेस्ट करून बघावी.

११) टमाटे:-

याने चेहर्याला रंग नक्कीच उजळतो. त्याच्ला गर काढून त्यात एक चमचा मध घालून नियमितपणे लावल्यास चेहरा उजळतो. टमाटे घेऊन त्याचा गर आणि मध एका बाउलमध्ये मिसळून घ्या. चेहरा आधी धुवून कोरडा करून घ्या. मग चेहर्याला हे मिश्रण लाऊन घ्या. थोडे सुखल्यावर कोमात पाण्याने चेहरा धुवून घ्या. याने चेह्र्यावरील सुरकुत्या निघून जाऊन चेहरा तेजस्वी आननी ताजातवाना दिसू लागेल. आठड्यातून दोन वेळा याचा वापर करा. अशाच छान माहितीसाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा आणि पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद..

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *