उकळलेल्या चाहा-पत्तीला चुकूनही फेकण्याची चूक करू नका, कारण सोन्यापेक्षाही बहुमूल्य आहेत तिचे उपयोग .

जगात इतक्या साऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपल्यासाठी सर्वात मौल्यवान असण्याची शक्यता असते , परंतु, त्यांच्याबद्दल आपल्याला योग्य ज्ञान नसल्यामुळे त्या गोष्टीच महत्व आपल्याला समजत नाही . आणि त्यामुळे अश्या गोष्टींना आपण फेकून देतो . आज आम्ही आपणास एक अश्याच गोष्टीबद्दल बद्दल सांगणार आहोत ते  तुमच्यासाठी काचऱ्या समान असतात, परंतु तिचे वास्तविक महत्व हे बहुमूल्य असते  . हि दुसरी तिसरी गोष्ट नसून आपल्या रोजच्या वापरातील चायपत्ती आहे .

सकाळी उठताच तुम्ही सुद्धा माझ्या सारखेच चहा पिण्यास पसंती देत असाल .किंवा चहाला शरीराचा ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही चहा पितअसाल . चहा हा आपल्या भारतीयांच्या जीवनाचा एक महत्वाचा हिस्साच बनला आहे .  तर आपण सर्व चहा बनवतो आणि  नंतर उकळलेल्या चहा पत्ती ला आपण फेकून देतो कारण आपल्या दृष्टोकोनातून उकळलेल्या चहा पत्तीला काहीच महत्व किंवा उपयोग नसतो  . पण आपणास माहित नाही की उकळलेल्या  चहा पत्तीला सुद्धा विविध प्रकारचे फा*यदे आहेत. तर आज आम्ही तुम्हाला उकळलेल्या चहा पत्तीचे फा*यदे सांगणार आहोत .

जखमांना भरण्यासाठी मदत करते :-  मित्रांनो उकळलेली चहापत्ती मध्ये असे घटक असतात जे मोठ्या जखमा देखील भरून काढतात  त्यामुळे जुन्या कळतील लोक जखम झाल्यानंतर ती लवकर बरी होण्यासाठी उकलल्या चहा पट्टीचा लेप लावत असे . त्या जखमेवर जर  उकळलेल्या चहापत्तीचा लेप दिल्यास  जखम लवकर भरण्यास मदत होते . विचार करा, जर आपण चहाच्या पानांमधून मोठ्या जखमा बऱ्या करू शकतो  तर मग रुग्णालयाचे  महाग बिल  का भरावे? शास्त्रज्ञ जखमेच्या उपचारांमध्ये चहाच्या पानांचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा याबद्दल ते संशोधन करीत आहेत. आणि ज्या दिवशी हे संशोधन  यशस्वी होईल त्या दिवशी देशामध्ये अनेक  समस्या कमी होतील.

काच स्वच्छ करण्यासाठी :-   तर आपण विचार करत असाल कि उकळलेली चहापत्ती काच साफ करण्यासाठी  कशी मदत करणार ? . सोपी गोष्ट आहे जर उकलल्या चहापत्तीत तुम्ही पाणी टाकले आणि त्याला गरम करून त्यातील पाणी बाजूला घेऊन स्प्रे बॉटल मध्ये टाकून ते पाणी क्लिनर सारखे काम करू शकते . जर स्प्रे चा वापर तुम्ही काच स्वच्छ करण्यासाठी कराल तर तुमची काच आरश्या पेक्षा पारदर्शक आणि स्वच्छ होईल .

रोपट्यांचा खत :-  जास्त तर  घरांमध्ये रोपटे वाढवले जातात खास करून शेतकरी वर्गात आजकाल रोप बनवनासाठी  शेतकरी रोपवाटिकांचा वापर करतात आणि त्यामध्ये विविध प्रकारचे खत टाकतात . पण अश्या वेळी जर तुम्ही रासायनिक खतांचा वापर न करता तुम्ही उकळलेल्या चहापत्ती चा वापर करू शकता. यामुळे तुमचे रोपटे निरोगी राहते आणि त्याची वाढ हि अतिशय जोमाने होते . बाहेरील महागड्या खतांचा वापर टाळून जर उकळलेल्या चहापत्तीचा वापर केल्यास तुमचे खूप सारे पैसे वाचू शकतील .

लाकडाच्या (फर्निचर) वस्तू स्वच्छ करण्यासाठी :-   होय, मित्रांनो  अगदी खर आहे  , आपण फर्निचर साफ करण्यासाठी उकळलेली चहापत्ती  वापरू शकतो . असे करण्यासाठी तुम्ही चहापत्ती दोनदा स्वछ पाण्याने धुऊन घ्या . मग त्या पाण्याने फर्निचर स्वच्छ करा. हे केल्याने , आपले फर्निचर एकदम नवीन ब्रँड ब्रँड सारखे चमकू लागेल . म्हणून फर्निचर स्वछ करण्यासाठी तुम्हाला बाजारामधून कोणत्याही फर्निचर लीकविड ची गरज नाही पडणार . तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा ज्यामुळे तुमच्या मित्रांना एक चांगाली मदत होऊ शकते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *