तुमच्या बंद नशिबाचे दार उगडेल ,फक्त बुधवारी करावे लागतील हे ३ कामे

खराब नशीब ही अत्यंत वाईट गोष्ट. जेव्हा दुर्भाग्य हात धुवून आपल्या पाठी लागते तेव्हा चांगले चाललेले काम पण बिघडायला लागतात. जर आपण पण त्या लोकांतील असाल ज्यांच्या नशिबाचे कुलूप कायम बंद असते तर टेंशन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत ज्याने आपले भाग्य उजळेल आणि ते बघून आपणही चकित व्हाल. या जगात अधिकतर खेळ हा नशिबाचा असतो. जर आपले नशीब साथ देईल तर सगळी कामे सहजपणे पूर्ण होऊन जातात. नशिबाची दार उघडायला आपण श्री गणेशाची मदत घेऊ शकता. भाग्य विधाता म्हणून ओळखला जाणारा गणपती बाप्पात नशीब बदलण्याची क्षमता असल्याचं मानतात. फक्त तुम्हाला त्यांना प्रसन्न करता आलं पाहिजे.

आजच्या आमच्या या उपायात आपल्याला बुधवारच्या दिवशी तीन खास काम करावी लागतील. या कामानंतर नशिबात आपल्याला बदल जाणवायला लागेल. हे तिन्ही काम आपण एकाच बुधवारी ही करू शकता. किंवा मग तीन बुधवारी ही करु शकता. चला तर उशीर न करता नशीब बदलण्याचे उपाय जाणून घेऊ.

पहिलं काम : बुधवारच्या दिवशी गणपती मंदिरात मोदकांचा प्रसाद चढवा. प्रसाद देवाला दाखवल्यावर तो मंदिराबाहेर बसलेल्या गरिबाला खायला द्या. जर कुणी गरीब नसला तर आपण तो प्रसाद गायीला सुद्धा देऊ शकता. सहसा लोक मंदिरात गेल्यावर प्रसाद तिथल्या लोकांना वाटत नाही. तो तसाच घरी घेऊन येतात. पण जर आपण तो जास्तीत जास्त तिथेच मंदिरात वाटला तर आपलं मोठं मन बघून गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि आपली सगळी काम सुरळीत पार पाडतील.

दुसरं काम : बुधवारच्या दिवशी दानधर्म करण्याला फार महत्व आहे. यादिवशी आपण गणपती मंदिरात कुठलीही वस्तू जसे घंटी, मूर्ती, पूजेचे ताट इत्यादी दान करू शकता. जर मंदीरात कुठलं साहित्य देऊ शकत नसाल तर दान पेटीत काही पैसे टाकून द्यावे. याशिवाय मंदिराबाहेर बसलेल्या गरिबांना देखील दान केले जाऊ शकते.

तिसर काम : बुधवारच्या दिवशी गणपतीचा उपवास ठेवल्याने देखील बरेच फायदे होतात. पण हा उपवास साधारण नसणार. यात खाण्यासोबत आपल्याला बोलणेही बंद ठेवावे लागणार. अर्थात आपल्याला मौन व्रत धारण करायचा आहे. जेवणाचं म्हणलं तर फळ आणि पाणी घेऊ शकता. याप्रकारच्या मौन व्रतने गणपती आपल्या त्याग व मेहनतीने प्रसन्न होतो आणि बदल्यात मनातील इच्छा पूर्ण करतो. याने आपल्या पूर्वीच्या चुका आणि पाप माफ होते. अशा प्रकारे दुर्भाग्य आपला पिच्छा सोडून देत.

जर आपल्याला हे उपाय आवडले तर ते इतरांसोबत ही शेअर करा. जेणेकरून ते सुद्धा याचा फायदा घेऊ शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *