सकाळी सकाळी उपाशी पोटी खा तुळशीचे पाने होतील हे ५ आरोयदायी फायदे

तुळशीचे रोप हे एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला प्रत्येक घरात बघायला मिळते. सहसा लोक ते पूजापाठ करायला लावतात. हिंदू धर्मात तुळशीला देवीचं रूप मानलं आहे. म्हणूनच ते पवित्र मानलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का की तुळशीचे पवित्र असण्यासोबतच आरोग्यदायी ही आहे. आयुर्वेदानुसार तुळशीत अनेक औषधी गुण आहेत. म्हणून जर तिचा वापर योग्य पध्दतीने केला तर अनेक स्वास्थ समस्यांपासून सुटका मिळू शकते. रिकाम्या पोटी तुळशीचं पानं खाल्ल्याने अनेक रोगापासून बचाव होऊ शकतो. चला तर तुम्हाला सांगतो तुळशीचे पान खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात.तुळशीचे पान खाण्याचे फायदे .

सर्दी खोकला ठीक करत :जर आपल्याला सारख सर्दी खोकला होत असेल तर तुळशीचे पान खाणं आपल्यासाठी फायदेशीर ठरत. यात ऍन्टी बॅक्टेरियल गुण असतात जे सर्दी खोकल्याचे किटाणू नष्ट करतात. तुळशीचे पान हळद आणि दुधात घेणे सुद्धा गुणकारी ठरते.

पचनशक्ती सुधारते :अपचन, गॅस सारख्या समस्यांनी त्रस्त लोकांसाठी तुळस कुठल्या वरदानपेक्षा कमी नाही. हे खाल्ल्याने केवळ पचनशक्तीच सुधारत नाहीतर पोटात होणारी जळजळ सुद्धा कमी होते. ह्याने आपल्या शरीरातील पीएच लेव्हल नियंत्रित राहते.

तणाव दूर करत :जर आपल्याला ताण किंवा डोकेदुखीची समस्या असेल तर आपण रोज सकाळी उपाशी पोटी तुळशीचे 3-4 पान चावून खाल्ली पाहिजे. तुळशी मध्ये अडैप्टोजेन नामक एक तत्व असतो जो आपली नर्व्हस सिस्टिमला रिलॅक्स राहण्यास मदत करत. याने ताण कमी होतो आणि ब्लड फ्लो पण नीट चालतो.

श्वासातील दुर्गंधी दूर करते :श्वासातून येणारा दुर्गंध आपल्याला नजरेतून उतरवू शकत. हे आपल्या तोंडाच्या हाईजिनसाठी पण नुकसानदायी ठरत. अशात आपण तुळशीचे पान चावून खाल्ले तर यातील तत्त्व तोंडातील बॅक्टरीया नष्ट करतात.

इम्युनिटी वाढवते :जर आपल्या शरीरात रोग प्रतिकारक्षमता (इम्युनिटी सिस्टीम) चांगली असेल तर आपलं शरीर स्वतः अनेक रोगांना संपवत. ही क्षमता वाढवण्यास तुळस आपल्याला मदत करू शकते. यात अँटी-बायोटिक आणि अँटी-ऑक्सिडंट गुण असतात. जे इम्युनिटी सिस्टीम मजबूत करण्याचे काम करतात. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर पाण्यात तुळशीची पान टाकून ठेवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते खा. याने आपल्याला भरपूर लाभ मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *