‘द कपिल शर्मा शो’ च्या मागिल एपिसोड मध्ये खूप निर्लज्ज पणा झाला ज्याच्याकडे कुणाचे लक्ष पण असेल गेलं ..

स्टँडअप कॉमेडी शो ‘ द कपिल शर्मा शो ‘ मध्ये ६०, ७०, ८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रहमान, आशा पारेख, हेलन यांना बोलवण्यात आले. अभिनेत्रींनी आपल्या काळातील फिल्म मेकिंग, कामाची पद्धत आणि अभिनेता-अभिनेत्री विषयी जुडलेले अनेक किस्से सांगितले.

शो ठीक चालला होता. नेहमीसारखे सगळे कलाकार येत होते. आपला भाग प्रदर्शित करून चालले होते. एज आल्वेज गाण्यावर कॉमेडी चालली होती. नंतर सुमोना चक्रवर्तीची एन्ट्री होते. कपिल शर्मा तिच्याबद्दल असच काहीबाही बोलत असतो. ज्या वेगळ्याच वाटत शकतात, पण कॉमेडी शोचा फॉरमॅटच तो आहे.

नवीन गोष्ट अशी की यावेळी सुमोनाची स्क्रिप्ट आणि रोलप्ले पण वाईट होते. सुमोना तयार होऊन येते. आपल्या ओळी बोलायला लागते. ती म्हणते की, हेलनने तिला आपल्या घराची सून म्हणून घ्यावं. कॉमेडी करायला ती सारखी सलमान सोबत लग्न करण्यासाठी हेलेनना विनवणी करते. मध्येच स्वतः किती सुंदर असल्याचे ही बोलते.

एका ‘सुंदर’ स्त्रीने अमीर आणि यशस्वी व्यक्तीशी लग्न करणे हा तिच्या जीवनातील एकमेव उद्देश आहे का ? नवऱ्याच्या पैशावर ऐशो आरामात जीवन जगायचं ? ती मुलगी सुंदरतेच्या बळावर सगळं काही हासिल करू इच्छित आहे. आणि शो मध्ये असे दाखवले आहे की, स्त्री दिसण्याच्या जोरावर हे साध्य करू शकते. कारण तिची सुंदरता कुठल्याही यशस्वी पुरुषाला आकर्षित करण्यासाठी पुरी असते. म्हणून तिच्या जीवनाचा आधार तिची सुंदरता आणि आकर्षण आहे. तिला जीवनात अजून काही नको आहे.

यात ही गोष्ट लपली आहे की, स्त्रियांमध्ये दुसरं कुठलं टॅलेंट नसत. आणि तिच्याशी लग्न करणाऱ्याला फक्त तिचा चेहरा आणि तीच शरीर इतकंच महत्वाचं आहे.

शो चे डायरेक्टर, स्क्रिप्ट रायटर सुमोनाचे पात्र कॉमेडी बनवण्यासाठी तिला स्ट्रगलिंग अभिनेत्री म्हणून दाखवू शकले असते. अभिनेत्रींसमोर तिचे ऑडिशन घेऊ शकले असते. तिच्याकडून डांस किंवा डायलॉग करवून घेऊ शकले असते. जुन्या काळातील चित्रपटातील एखादा सीन करायला लावू शकले असते. तर ती गोष्ट ताजी कॉमेडी करू शकली असती. कारण जाहिरात असो वा फिल्म सेक्सिजम शिवाय क्विक आणि पॉप्युलर दुसरी कुठली कन्सेप्ट नाही. शो सोबत एक डिसक्लेमर लाईन दिली पाहिजे की, ‘ सेक्सिजमच्या काळात क्लासिक कॉमेडीची इच्छा ठेऊ नये.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *