कश्मीरमध्ये सरेआम झाले होते बलात्कार, रातो-रात मारून टाकले होते शेकडो पंडित..बघा

भारत-पाकिस्तानच्या फाळणी नंतर पडलेली काश्मीरची ठिगणी 70 वर्षानंतर आजही धगधगत आहे. 1990 नंतर काश्मीर मध्ये हत्यारबंद आंदोलने सुरू झालेले. या आंदोलनानंतर लाखो काश्मिरी पंडित आपले घर-दार सोडून चालले गेले होते. त्यावेळी झालेल्या नरसंहारात शेकडो काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या होत्या.

काश्मीर मध्ये हिंदूंच्या हत्या करण्याला सुरुवात 1989 मध्ये जिहादसाठी गठीत जमात-ए-इस्लामी ने केलेली.

ज्याने काश्मीर मध्ये इस्लामिक ड्रेस कोड लागू केला. त्याने नारा दिला आम्ही सगळे एक, तुम्ही पळा वा मरा.

यानंतर काश्मिरी पंडितांनी घाटी सोडली. करोडोची संपत्ती असलेले काश्मिरी पंडित आपली जमीन सोडून रिफ्युजी कॅम्पमध्ये राहण्यास मजबूर झाले.

३०० पेक्षा अधिक हिंदू महिला व पुरुषांची झाली होती हत्या.

घाटीत काश्मिरी पंडितांचे वाईट दिवस सुरू झाले ते 14 सप्टेंबर 1989 पासून. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व वकील कश्मिरी पंडित तिलक लाल तपलूची जेकेएलएफ ने हत्या केली.

त्यानंतर जस्टीज नील कांत गंजूची पण गोळी मारून हत्या केली.

त्यावेळेच्या अधिकतर हिंदू नेत्यांची हत्या करण्यात आलेली. त्यानंतर ३०० हुन अधिक हिंदू महिला-पुरुषांची आतंकवाद्यांनी हत्या केलेली.

उघड उघड झाले होते बलात्कार :-

मीडियाच्या रिपोर्ट नुसार एक काश्मिरी पंडित नर्सवर आतंकवाद्यांनी सामूहिक बलात्कार केला आणि मग तिची मारून मारून हत्या केली.

घाटी मध्ये अनेक काश्मिरी पंडितांच्या वस्तीत सामूहिक बलात्कार आणि मुलींचे अपहरण करण्यात आले होते.

एक स्थानिक उर्दू वृत्तपत्र हिज्ब – उल – मुजाहिदीन ने पत्रक जारी केलेले. सगळे हिंदू आपले सामान बांधावे आणि काश्मीर सोडून जावे.

आणखी एक स्थानिक वृत्तपत्र अल सफा ने पुन्हा त्याच घोषणा दिल्या. मस्जिद मध्ये भारत व हिंदू विरोधी भाषण दिले गेले. सगळ्या काश्मीरीना सांगितले की इस्लामिक ड्रेस कोड वापरा. एकतर मुस्लिम बना नाहीतर मग काश्मीर सोडून जा.

काश्मिरी पंडितांच्या घरांवर पोस्टर लावले होते, ज्यावर लिहिलं होतं ‘मुस्लिम बना नाहीतर काश्मीर सोडून जा’.

पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनजीर भुट्टो ने टीव्ही वर काश्मिरी मुसलमानांना भारतापासून वेगळं होण्यासाठी भडकवायला सुरुवात केली.

या सगळ्यात कश्मिरी पंडित रातोरात आपलं सगळं सोडून देण्यास मजबूर झाले.

१४ ऑगस्ट १९९३ ला डोडा मध्ये बस अडवून १५ हिंदूंची हत्या करण्यात आली.

२१ मार्च १९९७ ला संग्रामपूर मध्ये घरात घुसून काश्मिरी पंडितांना मारण्यात आले.

२५ जानेवारी १९९८ ला वांधमा मध्ये हत्यारबंद आतंकवाद्यांनी ४ परिवारातील २३ लोकांची गोळ्या घालून हत्या केली.

१७ एप्रिल १९९८ ला उधमपूर जिल्ह्यातील प्राणकोट गावात एका कश्मिरी पंडित कुटुंबातील २७ जणांची हत्या केली. यात ११ मुलांचा समावेश होता.

या नरसंहार नंतर घाबरून १००० हिंदूंनी पलायन केले.

२००० साली आनंतनागच्या पहालगाम मध्ये ३० अमरनाथ यात्रींची हत्या करण्यात आली.

२० मार्च २००० ला चित्ती सिंघपोरा मध्ये होला साजरा करत असलेल्या ३६ शिखांची गुरुद्वारा समोर आतंकवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली.

२००१ ला डोडा मध्ये ६ हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली.

२००१ मध्ये जम्मू काश्मीर रेल्वे स्टेशनवर सेनेच्या वेशात येऊन आतंकवाद्यांनी गोळीबार केला. त्यात ११ लोकांचा मृत्यू झाला होता.

२००२ मध्ये जम्मूत रघुनाथ मंदिर वर आतंकवाद्यांनी दोन वेळा हल्ला केला. पहिला ३० मार्चला आणि दुसरा २४ नोव्हेंबरला. या दोन्ही हल्ल्यात १५हुन अधिक जणांचा मृत्यू झाला.

२००२ ला क्वासिम नगर मध्ये २९ हिंदू माजदूरांना ठार केले. यात १३ स्त्रिया आणि एका मुलाचा समावेश होता.

२००३ मध्ये पुलवामा जिल्ह्यातील नदीमार्ग गावात आतंकवाद्यांनी २४ हिंदूंची कत्तल केलेली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *