जाणून घ्या किती असतो राष्ट्रपति, पंतप्रधान आणि सांसदांचा पगार ..?

भारताच्या राष्ट्रपतीला वेतनासोबतच जगातील सर्वात मोठ्या निवासात राहायला मिळत जे की 5 एकर मध्ये बांधलेलं आहे. केवळ त्यांच्या घराच्या देखभालीचा वार्षिक खर्च 30 कोटी असतो.

लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल लागले आहेत. यात निवडून आलेले नवे सांसद लोकसभेत जातील. या तुम्हाला सांगतो, देशातील संवैधानिक पदावर कार्यरत असलेल्या मान्यवरांचा पगार किती असतो आणि त्यांना काय काय विशेष सुविधा मिळतात.

राष्ट्रपतींच्या वेतानापेक्षा मोठं आहे त्यांचं घर :-

भारताचे राष्ट्रपती यांचं मानधन हे 5 लाख प्रति महिना असत. जानेवारी 2016 मध्ये हे 1.5 लाख वरून 5 लाख वर वाढवण्यात आले. याशिवाय त्यांना राष्ट्रपतीसाठी असलेल्या इतर सुविधा देखील मिळतात. सोबतच त्यांना जगातील सगळ्यात मोठ्या राष्ट्रपती भवनात राहायला मिळत जे 5 एकर मध्ये पसरलेलं आहे. हे राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या 330 एकर हरित क्षेत्रात येत. राष्ट्रपतीकडे 25 कारचा ताफा असतो. या ताफ्याच्या मधात त्यांची गाडी चालते. जेव्हा प्रणव मुखर्जी या पदावर होते तेव्हा ते मर्सिडीज बेंज S600 वापरत असत. राष्ट्रपती भवनाच्या देखभालीचा खर्च ही कोटीत आहे. यासाठी 30 कोटी वार्षिक बजत ठेवलेलं आहे.

राष्ट्रपती नंतर उप-राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्य न्यायाधीश :-

भारताचे उप-राष्ट्रपती यांचे मासिक मानधन 4 लाख रुपये असते. शिवाय त्यांना सुद्धा इतर सुविधा मिळतात. राज्यांचे राज्यपाल यांना मासिक मानधन म्हणून 3.50 लाख रुपये मिळतात. सोबतच यांच्याही खात्यात सुविधांची कमी नाही. भारताचे मुख्य न्यायाधीश यांना 2 लाख 80 हजार रुपये मासिक मानधन सोबत इतर काही सुविधा दिल्या जातात.

पंतप्रधानसाठी प्रायव्हेट जेट पण :-

भारताच्या पंतप्रधानांना 1.60 लाख रुपये प्रति महिना मानधन मिळत. 2012 मध्ये टाकलेल्या एका RTI मधून ही गोष्ट समोर आली होती. या RTI चे उत्तर जुलै 2013 मध्ये देण्यात आले होते. यात सांगितले होते की, मनमोहन सिंग यांची बेसिक सॅलरी 50,000 आहे. सोबतच त्यांना प्रति महिना 3000 रुपये खर्च भत्ता म्हणून मिळतो. तेच पीएमना प्रति दिवस मिळणारा भत्ता 2000 रुपये होता. त्यानुसार त्यांना एकूण 62,000 रुपये प्रति महिना मिळतात. याशिवाय त्यांना 45,000 रुपये प्रति महिना कांस्टीट्यूएंसी म्हणजेच निवडणूक क्षेत्र भत्ता मिळतो. तसे ह्या आकड्यांना बरेच वर्ष झालेत त्यात आता वाढ झाली असावी.

पंतप्रधानाना इतक्याच सुविधा असतात असे नाही. त्यांना नवी दिल्ली मधील 7, लोककल्याण मार्ग वरील बांगला, पर्सनल स्टाफ, खास सुरक्षा असलेली लिमोजीन कार, एसपीजी सुरक्षा, एक स्पेशल जेट आणि अजून बऱ्याच सुविधा मिळतात. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या एफिडेविट नुसार त्यांच्याकडे एकूण 2.5 कोटींची संपत्ती आहे. याशिवाय गुजरात मधील गांधीनगर मध्ये त्यांच्या नावावर एक फ्लॅट आहे. त्यांच्याकडे 1.27 कोटी रुपये फिक्स्ड डिपॉजिट असून 38,750 रोख रक्कम आहे.

निवृत्तीनंतरही मिळतात पंतप्रधानांना अनेक सुविधा :-

पंतप्रधान निवृत्त झाल्यानंतरही त्यांना 20,000 रुपये प्रति महिना पेंशन मिळते. निवृत्तीनंतरही पंतप्रधानांना दिल्लीत एक बांगला मिळतो. यासोबतच त्यांना एक पीए आणि एक शिपाई दिला जातो. निवृत्तीनंतरही पंतप्रधान रेल्वे मधून मोफत प्रवास करू शकतात. याशिवाय पूर्व पंतप्रधानाना देशांतर्गत एक्जीक्यूटिव क्लास विमान प्रवासाचे वार्षिक 6 तिकीट सुद्धा मिळतात. पूर्व पंतप्रधानांना पुढील पाच वर्षे ऑफिसच्या सगळ्या खर्चाचा रिफंड दिला जातो. त्यानंतर प्रति महिना 6,000 रुपये ऑफिस खर्चासाठी दिले जातात. पूर्व पंतप्रधानांना एक वर्षासाठी एसपीजी सुरक्षा देखील दिली जाते.

2018 मध्ये वाढले सांसदांचे वेतन :-

संसादांच्या वेतनाचे प्रावधान द सैलरी, अलाउंस एंड पेंशन ऑफ मेंबर्स ऑफ पार्लियामेंट एक्ट, 1954 अंतर्गत केले आहे. यानुसार खासदाराला 1 लाख रुपये बेसिक सॅलरी आणि 45,000 रुपये निवडणूक क्षेत्र भत्ता दिला जातो. 2018 च्या सुरुवात पर्यंत खासदारांना 50,000 रुपये बेसिक सॅलरी म्हणून दिले जात होते. याव्यतिरिक्त देखील खासदारांना इतर अनेक सुविधा मिळत असतात.

आमदारांचे वेतन देखील काही कमी नाही :-

आपल्या आमदारांना सर्वाधिक वेतन देण्यात तेलंगणा राज्य सगळ्यात पुढे आहे. तेलंगणा मध्ये आमदारांचे वेतन 2.50 लाख रुपये प्रति महिना आहे. त्यानंतर दिल्लीच्या आमदारांचे वेतन 2.10 लाख रुपये प्रति महिना आहे. दिल्लीच्या आमदारांचे वेतन 2018 मध्ये वाढवलेले. त्याआधी त्यांना 88,000 रुपये प्रति महिना मिळत होते. उत्तर प्रदेश मधील आमदारांना 1.87 लाख रुपये प्रति महिना वेतन दिले जाते. याशिवाय महाराष्ट्रात 1.70 लाख आणि जम्मू-काश्मीर व उत्तराखंड मध्ये 1.60 लाख रुपये प्रति महिना आमदारांना वेतन दिले जाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *