गैसचे बर्नर झाले आहे काळे आणि त्यातून कमी जाळ येत आहे ?..तर करा हा सोपा घरगुती उपाय ..

गॅस बर्नर काळे पडलेत ? आच मंद झाली आहे ? मग हा सोपा उपाय करून पहा. गॅसचे हे काळे पडलेले बर्नर साफ करायला खूप वेळ आणि मेहनत खर्ची पडते. जर तुम्हाला या कष्टांपासून स्वतःला वाचवायचे असेल तर हे सोपे उपाय करून काही मिनिटातच हे चमकवता येतील.

असे म्हणतात की घरातल्या अशा काही वस्तू ज्यांमुळे पटकन आज लागण्याचा धोका संभवतो, त्यांची नीट काळजी घेतली पाहिजे जेणेकरून घरात कोणताही धोका निर्माण होणार नाही आणि तुमचे कुटुंबही सुरक्षित राहील. पण तरीही लोक कधीतरी लहानशी चूक करून बसतात.

स्वयंपाकघरात असलेल्या प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला स्वच्छ जेवण मिळू शकेल. जशा आपण स्वयंपाकघरातल्या सगळ्या गोष्टी साफ करतो तसेच हे गॅस बर्नरही नियमितपणे साफ केले गेले पाहिजेत अन्यथा ते अति वापर झाल्याने ते काळे पडून जातात तसेच गॅसचा प्रवाह आणि ज्योत दोन्ही मंद होतात. जर हे बर्नर काळे पडले असतील तर हा सोपा उपाय करून पहा, हे केल्याने तुमचा बर्नर छान चमकू लागेल.


गॅसच्या सततच्या वापराने बर्नर काळे पडून जातात. काही सोप्या उपायांनी ते अगदी नव्यासारखे चमकवता येतील. यांसाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही, ज्या लिक्विडने बर्नर स्वच्छ होतात ते लिक्विड तुमच्या घरातच उपलब्ध आहे.

तुम्हाला फक्त रात्रभर याच्यात बर्नर भिजवून ठेवायचे आहेत. काळ्या पडलेल्या बर्नरना चमकवण्यासाठी एका मोठ्या वाटीत विनेगर घालून त्यात एक कप पाणी मिसळा. आणि या तयार लिक्विडमध्ये रात्रभर बर्नर बुडवून ठेवा. सकाळी बर्नरला लोखंडाच्या किंवा भांडी साफ करण्याच्या ब्रशने स्वच्छ करून घ्या. मग कपड्याने त्यांना स्वच्छ करून घ्या, तुमचे बर्नर नव्यासारखे चमकायला लागतील.

बाजारात हे विनेगर तुम्हाला स्वस्त म्हणजेच ५०० मिली ३५ रुपयांना मिळेल. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात हे तुम्हाला सहज मिळेल. फक्त चायनीज बनवण्यासाठी नव्हे तर बर्नर साफ करण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो. यांशिवाय तुम्ही गरम पाण्यात एका लिंबाचा रस घालून त्या लिक्विड मध्ये जर रात्रभर बर्नर ठेवून दिलेत तरी सकाळी बर्नर चांगल्या पद्धतीने स्वच्छ झालेले दिसतील. हे घरगुती उपाय करून पहा आणि बर्नर नव्यासारखे चमकवा.

अश्याच छान माहितीसाठी आमुचे पेज नक्की लाईक करा .आणि पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा कारण माहिती कुणाच्याही उपयोगी पडू शकते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *