प्रत्येक रविवारी द्या सूर्य देवताला हा अघ्य , ह्या ६ समस्येंपासून कायम स्वरूपी मिळेल मुक्ती .

हिंदू पुराणात सूर्यदेवाला फार महत्व दिले आहे. यांचं मानलं तर सूर्य आणि चंद्र इतर ग्रहांपेक्षा अधिक पूजनीय आहेत. म्हणतात की, सूर्याची चमक माणसाला नेहमी योग्य मार्गावर चालण्यास प्रेरणा देते. तेच आपल्याला सूर्यापासून केवळ उर्जाचं नाहीतर अनेक लाभ ही मिळतात. अनेक लोकांना सकाळी उठून सूर्याला अर्घ्य देण्याची सवय असते. पण बऱ्याच लोकांना पूजेची योग्य माहिती नसते. हिंदू शास्त्रानुसार माणसाने सकाळी लवकर उठून सूर्याची पूजा केली पाहिजे.

याला माणसाचे पहिले कर्म सांगितले आहे. हे आपल्याला केवळ शारीरिक नाहीतर मानसिक शक्ती सुद्धा देते. जर काही कारणास्तव आपण सूर्याला अर्घ्य नाही देऊ शकत तर आपण रविवारच्या दिवशी दिल्याने विशेष फल प्राप्त होत. ज्या लोकांना लहान लहान गोष्टींवर राग येतो किंवा जे रागावर नियंत्रण नाही ठेऊ शकत त्यांनी सकाळी सकाळी उठून सूर्यदेवाची पूजा केली पाहिजे.

जी व्यक्ती दररोज असे करेल ती अहंकार, क्रोध, लालच, इच्छा, विश्वासघात या सगळ्यांतून मुक्त होते. त्याच्यात सकारात्मकता निर्माण होते. आज आम्ही या पोस्टमध्ये सूर्यदेवाची पूजा करण्याची योग्य पद्धती आणि रविवारच्या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने कसा मोठा लाभ होतो याबद्दल सांगणार आहोत.

सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचा नियम :-

सूर्यदेवताला नेहमी तांब्याच्या भांड्यानेच अर्घ्य दिला पाहिजे. स्टील, लोखंड, चांदी, काच, प्लॅस्टिकच्या पत्रातून अर्घ्य देणे व्यर्थ ठरत आणि त्याचा परिणाम दिसून येत नाही. तांबे हे सूर्यदेवतासाठी सगळ्यात प्रभावी धातू आहे.

सूर्यदेवताला अर्घ्य देण्याचा विधी :-

दररोज अंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून तांब्याच्या पत्रात पाणी घेऊन त्यात फुल टाकून ते पाणी सूर्याला अर्पित करावे. फुलात आपण कुठलेही लाल फुल घेऊ शकता. काही लोक तांब्यात गूळ आणि तांदूळ टाकून पाणी अर्पित करतात. असे कधीच करू नये, त्याने पूजेचे फळ प्राप्त होत नाही. अर्घ्य द्यायला लाल चंदन, लाल फुल, तांदूळ आणि साखरेचा वापर केला पाहिजे. पाणी दोन्ही हातांनी द्यावे व लक्षात असू द्यावे की त्यात सूर्याच्या किरणांची धार त्यात दिसली पाहिजे. सूर्याला अर्घ्य देताना दिशेचे पण लक्ष ठेवले पाहिजे. नेहमी पूर्व दिशेला तोंड करूनच अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना आपण खालील मंत्राचा जप करू शकता.

ॐ सूर्याय नमः सूर्याय नमः ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः

सूर्याला अर्घ्य दिल्यावर आपण आपल्या क्षमतेनुसार कुठल्याही ब्राम्हण किंवा गरिबाला तांब्याच भांड, लाल कापड, गहू, गूळ, कमळाचे फुल आणि लाल चंदन रविवारच्या दिवशी दान करावे.

या समस्यांपासून मिळते मुक्ती :-

रविवारच्या दिवशी सांगितलेल्या नियमानुसार सूर्याला अर्घ्य देणाऱ्या लोकांना डोकेदुखी, पित्त रोग, आत्मिक निर्बलता, नेत्र दोष, संधिवात इत्यादी समस्यापासून मुक्ती मिळते.

माहिती आवडली असेल तर आवश्य शेअर करा आणि अश्याच छान माहितीसाठी आमुचे पेज नक्की लाईक करा .धन्यवाद .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *