प्रत्येक सोमवार च्या दिवशी शिवलिंगावर वाहा ह्या गोष्टी , बोलेनाथ खोलतील तुमचे नशिबाचे दार ..

शिवलिंगाची पूजा करताना लोक शंकराच्या आवडीचे बेलपत्र, दूध, भांग नेहमी चढवत असतात. पण याशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या मनोभावे पूजा करून चढविल्यास भोलेनाथ प्रसन्न होतात आणि आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात. आपण खाली दिलेल्या गोष्टी सोमवारी, शिवरात्री, श्रावण महिन्यात किंवा त्रियोदशीला शंकरजीला नक्की अर्पण कराव्या.

कच्चे तांदूळ :-

पूजा करताना कच्चे तांदूळ शिवलिंगावर वाहावे. कच्चे तांदूळ शिवलिंगावर वाहिल्याने माणसाला आर्थिक लाभ होतो व त्याच्या जीवनात कधीच अन्नाची कमतरता भासत नाही. फक्त एवढे लक्षात ठेवावे की शिवलिंगावर केवळ स्वच्छ आणि अखंड तांदूळ वाहावे. कारण तुटलेले तांदूळ वाहने योग्य मानलं जातं नाही.

मोहरीचे तेल :-

बुधवारच्या दिवशी शिवलिंगावर मोहरीचे तेल नक्की वाहावे. अस मानलं जातं की, बुधवारच्या दिवशी शिवलिंगावर मोहरीचे तेल वाहिल्याने सगळे ग्रह शांत होतात आणि माणसाने केलेले सगळे पाप शंकरजी माफ करून देतात.

बार्ली :-

शिवलिंगाची पूजा करताना आपण बार्ली नक्की वाहावी. बार्ली वाहिल्याने माणसाच्या सगळ्या समस्या दूर होतात. म्हणून जर आपल्याला काही समस्या असतील तर सोमवारी शिवलिंगावर बार्ली नक्की वाहावी. त्याने आपल्या समस्या दूर होतील.

दूध आणि साखर :-

शिवलिंगावर दूध आणि साखर एकसोबत वाहिल्याने बुद्धी तल्लख होते. म्हणून जी व्यक्ती अभ्यास करत असेल त्यांनी सोमवार दिनी साखर घालून दूध शिवलिंगावर वाहावे. साखरेच्या जागी आपण मधही वापरू शकता.

गहू :-

ज्या दाम्पत्याला संतान नाही त्यांनी सोमवारी मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि जलाभिषेक केल्यावर गहू वाहावे. असे केल्याने त्यांना पुत्र प्राप्ती होऊ शकते.

उसाचा रस :-

होय, उसाचा रस शिवलिंगावर वाहिल्याने देखील लाभ मिळतो. अस म्हटलं जातं की, नियमितपणे शिवलिंगावर उसाचा रस वाहिल्यास माणसाच्या जीवनात केवळ सुख समृद्धी येत राहते.

गायचे दूध :-

जर आपण कुठल्या आजाराने ग्रस्त आहात तर सोमवारी किंवा श्रावण महिन्यात शिवलिंगावर गायचे दूध व तूप वाहावे. या दोन्ही गोष्टी एकसोबत वाहिल्याने माणसाला रोगापासून मुक्ती मिळते आणि तो एकदम स्वस्थ राहतो.

लाजरीचे पान :-

जर आपले कुठलेही कार्य सफल होत नसेल तर आपण शिवलिंगावर लाजरीचे 11 किंवा 21 पाने वाहावे. असे केल्याने आपल्याला सफलता प्राप्त होईल आणि आपल्या जीवनातील समस्या दूर होतील. फक्त इतके लक्षात असू द्या की, पानं एकदम स्वच्छ असायला हवी. त्यावर माती किंवा छिद्र असायला नको.

माहिती आवडल्यास आवश्य शेअर करा .आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *