नवरीने नवरदेवाला मंडपामध्ये बघायला लावली खूप वाट ,त्यानंतर नवरदेवाने नवरीसोबत केले असे काही ..बघा

नवरदेव आणि त्याचे नातेवाईक यांना त्याचा होणाऱ्या पत्नीने बराच वेळ लग्न मंडपात वाट बघायला लावली. तेच जेव्हा नवरी उशिराने लग्न मंडपात आली तेव्हा नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनी तिला काही न विचारता उलट तिचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात केले. लग्नादरम्यान ही अनोखी गोष्ट घडली ती औरंगाबाद मध्ये. सांगितले जाते की, ज्यादिवशी नवरी रेणुका पवारचे लग्न होते त्याच दिवशी तिचा पेपरही होता. त्यामुळेच रेणुका आपल्या लग्न समारंभात उशिरा पोहचलेली. तेच नवरी उशिरा आल्यावर तिला काही न बोलता लग्नात आलेल्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले.

लग्नाच्या दिवशी होता पेपर :-

रेणुका 12वीची विद्यार्थिनी आहे आणि 20 वर्षीय रेणुकाचे लग्न शंकर नामक मुलाशी पक्क झालेलं. त्या दोघांच्या लग्नाची तारीख मार्च महिन्यात निघालेली. रेणुकाला माहीत होतं की, तिचे बोर्डचे पेपर याच महिन्यात येतील. म्हणून रेणुकाने लग्नाची तारीख ठरवतानाच आपल्या आणि मुलाच्या घरच्यांना सांगितले होते की, जर लग्नाच्या दिवशी बोर्डचा पेपर आला तर ती पेपरला प्राधान्य देईल.

लग्नाच्या दिवशी होता इकॉनॉमिक्सचा पेपर :-

रेणुकाच्या लग्नाच्या दिवशीच तिचा इकॉनॉमिक्सचा पेपर आलेला. त्यामुळे रेणुकाने आधी पेपर दिला आणि मग लग्न मंडपात येऊन शंकर सोबत फेरे घेतले. रेणुका पवारच्या म्हणण्यानुसार, लग्नाची तारीख निश्चित करण्याआधीच तिने सगळ्यांना सांगितलेले की, पेपर येणार नाही अशा दिवशी तिचे लग्न ठेवावे. पण असे होऊ शकले नाही आणि रेणुकाच्या लग्नाच्या दिवशीच तिचा इकॉनॉमिक्सचा पेपर आला. त्यामुळे रेणुकाने आधी सकाळी जाऊन आपला पेपर दिला आणि त्यानंतर 2:15 वाजता आपल्या लग्न समारंभात पोहचून लग्न केले.

शंकरच्या घरच्यांनी दिली रेणुकाची साथ :-

आजकाल मुलींच्या शिक्षणासाठी खुद्द त्यांचे पालक जास्त कसली रुची ठेवत नाहीत. पण शंकरच्या घरच्यांनी आपल्या होणाऱ्या सुनेला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आणि तिला पेपर देण्यापासून रोखले नाही. शिवाय जेव्हा ती पेपर देऊन आली तेव्हा तिचे चांगले स्वागत ही केले. सांगितले जाते की, जिथे रेणुकाचे लग्न होते तिथेच अजून तीन लग्न होते आणि तिन्ही लग्नात आलेल्या पाहुण्यांनी टाळ्या वाजवत रेणुकाचे स्वागत केले.

अत्यंत गरीब कुटुंबातील आहे रेणुका:-

हरसूल गावची राहणारी रेणुका अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. रेणुकाच्या आई-वडिलांच्या निधनानंतर तिच्या कुटुंबाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आहे. रेणुकाचे म्हणणे आहे की, शिक्षण तिच्यासाठी फार गरजेचे आहे. ती कुठल्याही परिस्थितीत शिक्षणाशी कसलीच तडजोड करणार नाही. अशाच सुंदर माहितीसाठी आणि बातम्यांसाठी आमुचे पेज नक्की लाईक करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *