सूरत अग्नितांडव :मरणाच्या तोंडातून वाचलेल्या 16 वर्ष्याच्या मुलीने फायर ब्रिगेडची खरी परिस्थिती सांगितली .

गुजरात मधील सुरत शहरात सरथाना नावाचा भाग आहे. त्याच भागात तक्षशिला नावाची एक तीन मजली इमारत आहे. सगळ्यात वरच्या मजल्यावर अलोहा कोचिंग क्लासेस आहेत. नाटा म्हणजे नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर ची तयारी करण्यासाठी आर्किटेक आणि डिझाईनिंगचे विद्यार्थी तिथे येतात. ही एक प्रवेश परीक्षा असते. उन्हाळ्यात इथे विद्यार्थ्यांची संख्या वाढते. उन्हाळी सुट्ट्या चालू असल्याने अनेकजण समर क्लासेसला ऍडमिशन घेतात.

24 मे ला ही असेच रोजसारखे विद्यार्थी क्लासला आले होते. जवळपास 40 विद्यार्थी होते. बिल्डिंग जवळच गुजरात इलेक्टरीसिटी बोर्डचे ट्रान्सफॉर्मर होते. ज्यात अचानक स्पार्किंग झाली आणि आग लागली. थोड्याच वेळात ती तक्षशिला बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली. तिसऱ्या मजल्यावर असलेली अलोहा कोचिंग क्लासेस टिनचा शेड टाकून चालवली जात होती. त्या टिन शेडने आग पकडली आणि धगधगत जाळायला लागला. त्यावेळी विद्यार्थी आतच होते. स्वतःला वाचवण्यासाठी काही खाली पाळायला लागले तर काहींनी खिडकीतून बाहेर उड्या मारल्या. सगळीकडे आक्रोश पसरला. जळल्याने आणि उड्या मारल्याने 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

उर्मी वकेरिया, 16 वर्षाची मुलगी आहे. ही सुद्धा आग लागली त्यावेळी क्लास मध्ये होती. ती कशीबशी आगीतून वाचली. तिला केतन चौडवाडिया नामक युवकाने वाचवले. आपण सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला असेल. ज्या एक मुलगा तिसऱ्या मजल्यावर उभा आहे आणि आगीतून मुलांना वाचवण्यासाठी मदत करत आहे. तोच मुलगा केतन चौडवाडिया आहे.

रिपोर्टनुसार केतनने दोन मुलींचे प्राण वाचवले. त्यातलीच एक उर्मी आहे. उर्मीचा कान आणि हाथ थोडा जळाला आहे. पण सध्या ती सुरक्षित आहे. उर्मीची मुलाखत घेतली तेव्हा ती अजूनही या घटनेतून बाहेर आलेली नाही.

या फोटोत केतन विद्यार्थ्यांना वाचवताना दिसतो आहे. केतननेच उर्मीला वाचले. फोटो क्रेडिट – व्हिडिओ

ती सांगत होती, ‘खाली आग लागली होती आणि धूर वर येत होता. धूर वाढला आणि मग क्लास मध्ये पण आग लागली. काही लोकांनी स्वतःला वाचवायला उड्या मारल्या तर काही आगीत जळाले.’

सुरत मध्ये सध्या सगळेच अग्निशमनवर राग काढत आहेत. रिपोर्टनुसार अग्निशामकचे कार्यालय केवळ 3किमी अंतरावर आहे, तरी घटनास्थळी पोहचायला त्यांना 45 मिनिटे लागली.

अग्निशमन बद्दल उर्मीला विचारल्यावर ती सांगते, अग्निशमन वाले आले तर खरे पण त्यांच्याकडे काहीच नव्हते. जे आम्हाला वाचू शकेल. कपडा, शिडी काहीच नव्हते. एक शिडी होती ती फक्त पहिल्या मजल्यापर्यंत येत होती.

उर्मीच्या वडिलांनी सांगितले, ‘अग्निशमन आले होते पण त्यांच्याकडे कुठल्याही सुविधा नव्हत्या. जाळी नव्हती, शिडी नव्हती, दोरी ही नव्हती. ज्या मुलांचा मृत्यू झाला ते वाचू शकले असते, जर अग्निशमनकडे सुविधा असत्या तर.’

या घटनेने सुरतेत शोककळा पसरली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीने 24 मेलाच मुलांच्या पालकांची भेट घेतली. मृत्यक मुलांच्या घरी ४-४ लाख मदत देण्याची घोषणा केली. याशिवाय घटनेच्या तपासाचे आदेश दिलेत. कारण आगीपासून वाचण्यासाठी क्लास मध्येही कुठली सुविधा नव्हती. पोलिसांनी अलोहा क्लासेसचे संचालक भार्गव बुटानीला अटक केली आहे. जे टिनच्या शेड मध्ये क्लासेस घेत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *