19 वर्षाच्या नुसरतला प्राध्यापकांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, तिने तक्रार केली तर तिला जिवंत जाळले ..

बांग्लादेश देशाची राजधानी ढाका पासून 100 मैल दूर एक छोटसं गाव आहे, फेणी. तिथे नूरसत जहाँ रफी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिच्या घरापासून थोडी लांब एक इस्लामिक शाळा होती. ती तिथे शिकायला जायची. एक दिवस शाळा प्राध्यापकांनी तिला ऑफिसमध्ये बोलवले. तिला जबरदस्ती स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. नूरसत कशीतरी खोलीतून पाळली. तिला भीती होती की, प्राध्यापक तिच्यावर बलात्कार करतील.

आपल्या वयाच्या इतर मुलींसारखी नूरसत चूप नाही राहिली. तिने निश्चय केला की ती प्राध्यापक विरोधात तक्रार करणार. म्हणून ती पोलीस स्टेशनला गेली. आपलं बयान दिल. जो ऑफिसर बयान घेत होता त्याने सगळं फोनवर रेकॉर्ड केले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाली.

व्हिडिओमध्ये नूरसत आपल्या हाताने चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यात पोलीस म्हणतो आहे की ‘ही काही मोठी गोष्ट नाही’. सोबतच तो तिला चेहऱ्यावरून हॅट काढण्यास सांगतो आहे. नूरसतच्या बयान नंतर प्राध्यापकाला अटक केली. पण आजूबाजूच्या लोकांनी प्राध्यापकाच्या अटकेनंतर रास्ता जाम केला. ते त्याच्या सुटकेची मागणी करायला लागले.

6 एप्रिलला नूरसत आपली अंतिम परीक्षा द्यायला शाळेत गेली. तेव्हा तिची एक मैत्रीण जवळ आली. बोलली की, तिच्या एक मित्राला काहीजण शाळेच्या छतावर मारत आहेत. जेव्हा नूरसत छतावर गेली तर पाच जणांनी तिला घेरले. त्यांनी तिच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला. नूरसतने सरळ नकार दिला. माहिती पूढे काय झालं ?

नूरसतला शाळेच्या छतावरच जिवंत जाळलं.:-

यौन शोषणाची तक्रार करणाऱ्या 19 वर्षीय मुलीला शाळेच्या छतावर जाळलं गेलं.
हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत नूरसत 80 टक्के जळली होती. उपचारासाठी नूरसतला ढाकाच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. 10 एप्रिलला नूरसतचा मृत्यू झाला.
मरण्याच्या आधी नूरसतने आपल्या भावाच्या मोबाईल मध्ये एक विडिओ रेकॉर्ड केला. त्यात तिने म्हटले , “माझ्यावर हल्ला करणारे माझ्या शाळेचे विद्यार्थी होते. मला त्या प्राध्यापकांनी वाईट नरजेने स्पर्श केला. मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार.”

नूरसतच्या मृत्यू नंतर बांग्लादेशचे लोक रस्त्यावर उतरले. हजारो लोकांनी या घटने विरोधात सोशल मीडियावर पोस्ट पण केल्या.

पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. त्यातील सात जण नूरसतच्या हत्येत सहभागी होते. सोबतच पोलिसांनी सांगितले की, हे लोक नूरसतच्या हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करत होते. पण नुसरत वाचल्याने त्यांची पोल खुलली.

पोलीस ब्युरो इन्व्हेस्टगेशनचे चीफ बनाज कुमार मजुमदारने बीबीसी बांग्ला ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले :

“हल्लेखोरांपैकी एकाने नूरसतचे डोकं खाली वाकवून धरले होते. बाकीनी तिच्यावर तेल ओतले आणि मग पेटवून दिले. म्हणून तिचे डोकं जळलं नाही.”

नूरसतचे यौन शोषण करणारा प्राध्यापक सुद्धा जेल मध्ये आहे. तेच व्हिडिओ बनवणाऱ्या पोलीस ऑफिसरला सस्पेंड केले आहे.

यौन शोषण आपल्यात एक घृणास्पद अपराध आहे. ज्या मुलीसोबत हे घडते ती कोणत्या परिस्थिती जगते याचा कुणी अंदाजही लावू शकत नाही. तिचे यौन शोषण करणाऱ्याला शिक्षा व्हावी एवढीच तिची इच्छा असते. जगभरात आणि विशेषतः आशियात यौन शोषण किंवा बलात्कार विरोधात तक्रार देने सोपे नाही. आणि कुणी हिंमत केलीच तर त्याचा परिणाम आपल्या समोर आहे.

श्रोत :- ओड़नारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *