मुलगा जन्माला घालण्याशी जोडलेल्या त्या पाच खोट्या गोष्टींना महिला आरामात खरं समजून जातात ,बघा

गर्भधारणा आणि डिलिव्हरी बद्दल अनेक मिथ्य आहेत. कदाचित या गोष्टी पिढ्यानपिढ्या केल्या जातात म्हणून. जसे वैदेहीची डिलिव्हरी तारीख निघून गेली होती तरी पण ती लेबर मध्ये पोहचली नव्हती. तिच्या आई आणि सासूने तिला चटपटीत आणि मसालेदार खाण्याचा सल्ला दिला. त्यांचं म्हणणं होतं की, त्याने वैदेही लेबरमध्ये चालली जाईल. अस काही झाले नाही. उलट गर्भधारणा काळात मसालेदार खाल्याने वैदेहीच्या छातीत जळजळ सुरू झाली. पण यात तिच्या आई आणि सासूची काही चूक नव्हती कारण हे एक रुजलेले मिथ्य आहे. पण या गोष्टीला कुठला मेडिकल पुरावा नाही की, चटपटीत आणि मसालेदार खाल्याने स्त्री लवकर लेबरमध्ये जाते.

डिलिव्हरी बद्दल अनेक मिथ्य आहेत जे स्त्रिया सहज मानतात. अशाच काही मिथ्यांचा पर्दाफाश आम्ही करत आहोत. यात आमची मदत करत आहेत डॉक्टर आराधना कपूर. या फोर्तीस हॉस्पिटल मुंबई मध्ये स्त्री रोग विशेषज्ञ आहेत.

१. डिलिव्हरी नंतर स्त्रीने अंघोळ करू नये आणि पाण्याला ही स्पर्श करू नये

भारतात असे अनेक लोक मानतात. नवीन आईला असे सांगितले जाते की, डिलिव्हरी नंतर काही दिवस अंघोळ करायची नाही. यात काही सत्य आहे ? डॉक्टर आराधना कपूर सांगतात :

“आपली डिलिव्हरी नॉर्मल असो वा सिजर. दोन्हीत आपल्याला टाके लावले जातात. त्यांना ठीक व्हायला काही वेळ लागतो. जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर कमीत कमी 24 तास थांबलेच पाहिजे. सिजर डिलिव्हरी झाली असेल टाके ठीक व्हायला कमीत कमी तीन आठवडे लागतात. दोन्ही प्रकारात थोडं काळजीपूर्वक राहण गरजेचं आहे. आपण कधी अंघोळ करू शकता याबद्दल आपल्या डॉक्टरला नक्की विचारलं पाहिजे. जोपर्यंत टाके ठीक होत नाही तोपर्यंत शॉवर वापरावे टबमध्ये बसून अंघोळ करू नये. अंघोळी नंतर ती जागा स्वच्छ करावी. डिलिव्हरीच्या 24 तासानंतर गरम पाण्याने अंघोळ नाही केली पाहिजे. कारण आपलं रक्त फार गेलेलं असत त्यामुळे चक्कर येऊ शकते.

२. बाळ बाहेर येताच आपली डिलिव्हरी संपते

फिल्म मध्ये सहसा बघतो बाळ जन्मले की ते पुसून पासून आईच्या हातात दिले जाते. सगळे नातेवाईक आणि परिवरवाले आई घेरतात. पण प्रत्यक्षात सीन वेगळा आहे. बाळ शरीरातून आले म्हणजे आपली डिलिव्हरी संपली असे होत नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बाळ शरीरातून बाहेर आल्यावर 30 मिनिटांनी प्लेसेंटा बाहेर येतो आणि जोपर्यंत तो बाहेर येत नाही तोपर्यंत डिलिव्हरी पूर्ण होत नाही. आता हा प्लेसेंटा काय आहे ?

प्लेसेंटा एक अंग असत जे प्रेजन्सी दरम्यान गर्भाशयात तयार होत. त्याच काम असत बाळाला ऑक्सिजन आणि पोषण पुरवणं. सोबतच त्याच्या रक्तातुन घाण काढणं. हे डिलिव्हरी नंतर शरीरातून निघत.

३. काय पाण्याची पिशवी फटाताच आपण लेबर मध्ये जाणार ?

पुन्हा चित्रपटांची चूक. चित्रपटात दाखवतात की पाण्याची पिशवी फाटताच आपण लेबरमध्ये जातात. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं. पण हेही सत्य नाही आहे. डॉक्टर आराधना कपूर सांगतात :

काँट्रेशन म्हणजेच गर्भाशय आटल्या आणि पसरल्यामुळे आपण लेबरमध्ये जाता. बाळ यामुळेच शरीरातून बाहेर येत. सामान्यतः मानलं जातं की, पाण्याची पिशवी फुटल्याने असे सूरी होते. पण हे सत्य नाहीये. पण काही स्त्रियांची पाण्याची पिशवी लेबरमध्ये गेल्याने फार लवकर फाटते. जेव्हा त्यांचं शरीर बाळ जन्माला घालण्यास तयार नसत.

४. पार्श्वभागाचे हाड रुंद असेल बाळ होण्यास सोपं पडत :-

अधिकतर भारतीय स्त्रियांची शरीराची चरणा अशी असते की त्यांच्या पार्श्वभागाचे हाड हे रुंद असते. अस मानलं जातं की, अशा स्त्रिया बाळाला सहज जन्म देऊ शकतात. त्यांना लेबर दरम्यान जास्त त्रास होत नाही. काय हे खरं आहे ? डॉक्टर आराधना कपूर सांगतात :

“नाही. ही एक सामान्य धारणा आहे पण यात काहीच सत्यता नाही. आपण किती सहजतेने बाळाला बाहेर काढू शकता याचा शरीराच्या रचनेशी काही संबंध नाही. काही स्त्रियांचे पार्श्वभागाचे रुंद दिसते पण त्यांचे पेडू पातळ असते. जितके पातळ पेडू तितका डिलिव्हरी मध्ये जास्त त्रास.

५. डिलिव्हरी नंतर रिकव्हरी साठी जिऱ्याचे पाणी पिणे :-

आता हे मिथ्य नाही सत्य आहे. डिलिव्हरी नंतर ओव्याचे पाणी पिल्याने आपले शरीर स्वस्थ आणि मजबूत बनत. डॉक्टर आराधना कपूर सांगतात :

“डिलिव्हरी नंतर जर आपल्याला वजन घटवायचे असेल तर आपण ओव्याचे पाणी प्यायला पाहिजे. सोबतच हेल्दी डायट पण घ्यावी. ब्रेस्टफिडिंग करताना ओव्याचे पाणी पिल्यास ब्रेस्टमिल्कची गुणवत्ता वाढते. त्यात अनेक पोषक तत्वे येतात जे बाळाच्या स्वास्थ्यासाठी महत्वपूर्ण असतात. इतकंच नाही तर, डिलिव्हरी नंतर आपल्या शरीरात काही काळ वेदना होतात. ओव्याचे पाणी त्यापासून अराम देण्यास मदत करत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *