नसबंदी केल्यानंतर ह्या माणसाने जे लिहले ते प्रत्येक पुरुषाने वाचले नक्की पाहिजे ..

केरळच्या राहणाऱ्या हसीब अंजुने जे केले ते मर्दांसाठी आदर्श आहे. हसीबने वासेक्टोमी करवली आहे. आता ही वासेक्टोमी काय आहे ?

हे जाणून घेण्यासाठी आम्ही डॉक्टर वंदना श्रीवास्तव सोबत बोललो, त्यांनी सांगितले की :’ही एक प्रकारची शस्त्रक्रिया असते. अंडकोशाच्या पिशवीत काही ट्युबस असतात. ज्यात वीर्य असत. शस्त्रक्रिया करून ते ट्युबस ब्लॉक केले जातात किंवा कापले जातात. उद्देश हा असतो की, संभोग करताना वीर्य बाहेर येऊ नये. या स्त्री गर्भवती राहणार नाही. ही एक सामान्य शस्त्रक्रिया आहे.’

जर या शस्त्रक्रिया बद्दल ऐकून आपली हवा टाईट झाली असेल आम्ही समजू शकतो. शस्त्रक्रिया म्हणलं की सगळ्यांना भीती वाटते. पण गर्भनिरोधसाठी स्त्रियांवर जी शस्त्रक्रिया केली जाते ती या शस्त्रक्रिया पेक्षा अधिक पटीने धोकादायक असते.

हीच गोष्ट हसीब मर्दांना समजवू इच्छित आहे. वासेक्टोमी नंतर त्याने फेसबुकवर एक पोस्ट केलेली आहे. तो या शस्त्रक्रियाशी जुडलेले सगळे गैरसमज दूर करू इच्छित आहे. हसीबचा उद्देश हा की लोकांचे डोळे उघडावे.

हसीब केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील राहणारा आहे. नुकताच त्याच्या पत्नीने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मानंतर हसीबने वासेक्टोमी करवून घेतली. त्याबद्दल फेसबुकवर एक पोस्ट ही लिहिली. सोबत हे ही लिहिलं की, त्याने शस्त्रक्रिया का केली. पोस्ट मल्याळम मध्ये आहे.

जशी पुरुषांसाठी वासेक्टोमी असते तशी स्त्रियांसाठी ट्युबेक्टोमी नावाची शस्त्रक्रिया असते. ही वासेक्टोमी पेक्षा अधिक त्रासदायक व धोकादायक असते. ती कशी होते ते डॉक्टर वंदना श्रीवास्तव ने सांगितले आहे.

“फैलोपियन ट्युब्स एक प्रकारचे ट्युब्स असतात ज्या गर्भाशयापर्यंत जातात. अंडे याचद्वारे गर्भाशयात जातात. जर हे विर्याच्या संपर्कात आले तर स्त्री गर्भवती होते. ट्युबेक्टोमीने हे ट्युब्स कापले जातात किंवा ब्लॉक केले जातात. ज्यामुळे अंडे गर्भाशयापर्यंत पोहचत नाही.

दुसऱ्या बाळानंतर हसीब आणि त्याच्या पत्नीने निर्णय घेतला की, ते आता आणखी मुलं घेणार नाही. दुसरे बाळ शस्त्रक्रिया करून झालेलं. दोघांनी निर्णय घेतलेला की, एकतर ते वासेक्टोमी करतील किंवा ट्युबेक्टोमी करतील.

हसीबने आपल्या पोस्टमध्ये वासेक्टोमी विरुद्ध ट्युबेक्टोमी डिबेट घेतलं. प्रश्न एकदम सोपे होते पण महत्वाचे होते. त्याने लोकांना विचारले की, आपल्याकडे या दोन शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय असला तर आपण कोणता पर्याय निवडाल ? एक जी थराच्या खाली असते ती की ज्यात पोट चिरले जाते ती. जाहीर आहे की, सगळेच सोपा पर्याय निवडतील. त्यानंतर हसीबने विचारले की नेहमी स्त्रियांना धोकादायक शस्त्रक्रिया करण्यासाठी दबाव का आणला जातो. तेच पुरुष त्याहून सोपी शस्त्रक्रिया करवू शकतात.

सोबतच हसीबने आपला अनुभव ही सांगितला. ही शस्त्रक्रिया करायला त्याला फक्त 20 मिनिटे लागले. एक दिवस तो आपलं काम करून घरमालकाला भेटायला गेला. ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. तिथे त्याने वासेक्टोमी बद्दल जनरल सर्जनला विचारपूस केली. एक-दोन टेस्ट केल्या, शस्त्रक्रिया केली, कपडे घातले, बिल भरले, औषधे घेतली आणि घरी आला. हे इतके साधे आणि सोपे होते. हसीबने हे ही सांगितले की, त्याला फक्त इंजेक्शन देताना थोडा त्रास झालेला. त्यानंतर कुठलाच त्रास जाणवला नाही.

हसीबने पोस्टमध्ये सांगितले की, वासेक्टोमीने कुठलेच नुकसान होत नाही. याने सेक्स करण्यात काहीच अडचण येत नाही. सगळं तसच राहत जस आधी होत. ना त्रास ना जखम राहते. पण तेच ट्युबेक्टोमी मध्ये स्त्रियांना इन्फेक्शनचा धोका राहतो. सोबतच ही शस्त्रक्रिया फार महाग असते.

हसीबने आपल्या पोस्टमध्ये शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला. प्रश्न होता की, नेहमी स्त्रियांकडूनच त्रास सहन करण्याची अपेक्षा का ठेवली जाते ? तिने पण मुलं जन्माला घालताना कळा सोसल्या असतात. पुरुष गर्भनिरोधसाठी ही शस्त्रक्रिया का नाही करू शकत ?

जेव्हा पण गर्भनिरोधची वेळ येते तेव्हा त्याची जबाबदारी स्त्री खांद्यावर येते. मग भलेही गोळ्या खाऊन खाऊन तिच्या तब्येतीचे तीन तेरा वाजत. काही पुरुषांना गर्भनिरोधशी काही घेणेदेणे नसते. बदनाशिबी स्त्रिया हा त्रास सहन नाही करू शकत.आशा करतो की, हसीब ची ही गोष्ट आपण समजू शकल.

source :- odnari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *