1962 च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांची बॉडी मिळाली नव्हती , बायको 57 वर्षापर्यंत सौभाग्यवतीं बनून राहत होती .

राजस्थान मधील जोधपूर मध्ये पिपड तालुका आहे. तिथे एक गाव आहे खांगटा. खांगटा गावात गट्टू देवी राहतात. त्यांचे पती भीकराम ताडा भारतीय सैन्यात होते. 1962च्या भारत-चीन युद्धात ते शहीद झाले होते. गट्टू देवींनी पती शहीद झाल्यानंतर 57 वर्षांनी आपली सुहासिनीची निशाणी पुसली. 27 फेब्रुवारी 2019 ला त्यांनी असे केले आहे.

खांगटा गावात 27 फेब्रुवारी दिवशी भीकराम यांच्या मूर्तीचे अनावरण झाले. गट्टू देवींनीच अनावरण केले. गट्टू देवी जेव्हा आपल्या पतीच्या मूर्ती जवळ गेल्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तरीही स्वतःला सांभाळत त्यांनी कपाळावरचे कुंकू काढून पतीच्या चरणी अर्पण केले. इतके वर्षे त्या आपल्या पतीला जिवंत असल्याचं मानत होत्या. आणि एक सुहासिनी सारख्या राहत होत्या.

श्रोत

यामागे दोन कारण आहेत. पहिलं हे की, शहीद अमर होतात अस मानलं जातं. तर दुसरं म्हणजे, 50-60 वर्षांआधी शहिदांचे पार्थिव शरीर त्यांच्या घरी पोहचत नव्हते. भीकराम यांचेही शरीर त्यांच्या घरी पोहचले नव्हते. अशात पतीचे शरीरच बघितले नाही तर कसे मानणार की, पती शहीद झाले.

गट्टू देवी आता फार वृद्ध झाल्या आहेत. खूप लहान वयात त्यांचं लग्न भीकराम सोबत झालं होतं. दैनिक भास्कर मध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार, 1 जुलै 1943 रोजी गट्टू आणि भीकराम यांचे लग्न झाले होते. 1961 मध्ये ते आर्मीच्या पायरनियर कोर बंगलोर मध्ये भरती झाले. 1962 मध्ये जेव्हा चीनसोबत युद्ध झाले तेव्हा ते ही लढाई वर गेले होते. पण 8 सप्टेंबर 1962 रोजी ते शहीद झाले. पण त्यांचे शरीर घरी पोहचले नाही. गट्टू देवी म्हणाल्या की, त्यांच्या पतीचे शरीरच घरी आले नाही तर त्या कसं मानणार की, त्यांचे पती आता जिवंत नाही. म्हणून इतके वर्ष त्या सुहासिनी सारख्या राहत होत्या.

श्रोत

त्यांनी मुलांना आपल्या वडिलांच्या वीरतेचे किस्से ऐकवले. मुलांना चांगलं वाढवलं-शिकवलं. आणि त्यांना देशसेवेत पाठवलं. त्यांचा एक मुलगा आर्मी मध्ये तर दुसरा नेव्ही मध्ये आहेत. नातू पण मोठा झालाय आणि तो पण भारतीय सैन्यात आहे.

त्यांनी आपलं कर्तव्य चांगलं पार पाडल. आता जेव्हा त्यांना वाटलं की, आपण आपले सगळे कर्तव्ये पार पाडले तेव्हा त्यांनी आपले पती शहीद झाल्याचे मानून त्यांची मूर्ती गावात लावण्याचा निर्णय घेतला. 57 वर्षांआधी जेव्हा गट्टू देवींनी सुहासिनी राहण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा गावातील लोक त्यांना टोमणे मारायचे. पण त्यांनी सगळं सहन केलं. हिंमतीने सुहासिनी सारखी राहिली. त्यांनी मुलांना शिकवलं, त्यांना वडिलांचे किस्से सांगितले, त्यांचा मनात देशभक्तीची भावना निर्माण केली. आणि दोन्ही मुलांना देशसेवेसाठी पाठवून दिले.

read more :- CCC Online Test

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *