मेजर विभूति आणि निकिताची प्रेम कहानी, म्हणाली- प्रेम काय असते ते मला विभूति शिकवलं ..

आपल्या देशाचे सैनिक किती बहादूर असतात ते आपल्याला माहितीच आहे. पण तितकीच वीरता आणि बहादूरी त्यांच्या कुटुंबीयांत असते जे परिणामाची पर्वा न करता आपल्या मुलाला, भावाला, नवऱ्याला देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठवतात. अशीच बहादूरता त्यादिवशी बघायला मिळाली ज्यादिवशी पुलवामा हल्ल्याच्या बदला घेताना मेजर विभूति ढौंडियाल शहीद झाले. जेव्हा त्यांचे पार्थिव देह आणले गेले तेव्हा त्यांच्या अंतिम यात्रेत सहभागी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

त्या शहिदाच्या बाजूला त्याची पत्नी होती. जीचे डोळे पाणावलेले होते आणि आवाज कापत होता. पण मनात पतीवर गर्व होता. मेजर विभूतींच्या पत्नीने त्यांना ज्याप्रकारे अखेरचा निरोप दिला ते बघून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. विभूतींची पत्नी नितीकाने आपली प्रेमकथा जगाला सांगितली, जी ऐकून आपल्याला ही गर्व वाटेल.

मेजर:- ऐक ना, तुला भीती नाही वाटत का ?

पत्नी:- कसल्या गोष्टीची ?

मेजर:- मी सैनिक आहे, कधी परतलो नाहीतर ? सीमेवर कधी गोळी, कधी बॉम्ब.

पत्नी:- ओरडून ! मी गर्वाने मोहल्ल्यात सांगेल की, “माझ्या पांढऱ्या ओढणीने तुमच्या सगळ्यांना लाल दुपट्टा दिला आहे.”

मेजर:- तू फौजीची फौजन आहेस पक्की. मिठी दे ह्यावर गोष्टीवर.

पत्नी:- सरका, तुम्हाला तर बस कारण लागत.

.
.

तुमकोमुबारक़ज़मानेकीखुशियां

मिटनाहैमुझकोमिटाजारहाहूँ।

प्रेमात बदलली मैत्री :- 

श्रोत

नितीका आपल्या पतीसोबत घालवलेले क्षण आठवून भावुक होते. त्यांनी सांगितले की, जवळपास 4 वर्षांआधी मेजर विभूतींची पहिली भेट दिल्लीत झाली होती. ही एकदम साधी भेट होती पण, मैत्रीचा रस्ता दोन्हीकडून खुलला होता. ही मैत्री अशी झाली की, काही दिवसातच प्रेमात बदलली. मग तर गोष्ट अजूनच पुढे गेली आणि दोघांनी सात फेरे घेत जन्मोजन्मी सोबत राहण्याचे वचन देत लग्न करून घेतले.

श्रोत

नितीका म्हणाली की, लग्नाच्या आधी प्रेम काय असत, काळजी काय असते हे माहीत नव्हतं. लग्नानंतर कळलं की, प्रेम काय असत. त्यांनी सांगितले की, त्यांच्या नात्यात सगळं काही मैत्रीसारखं होतं. नितीका बोलली की, विभूतीने माझे आयुष्य बदलले. लग्नानंतर विभूतीने तिची खूप काळजी घेतली आणि तिला प्रेम करायला शिकवलं. एक पत्नी म्हणून नितीकाच्या मनातही पतीविषयी भीती होती पण, विभूती त्यांना कायम एक गोष्ट सांगत.

अखेरचा निरोप देतानाही प्रेम व्यक्त केलं :- 

श्रोत

विभूती नेहमी नितीकाला सांगत असत की, तू सैनिकाची पत्नी आहेस तर प्रत्येक वातावरणात, प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक बातमीला सामोरे जाण्याची तयारी ठेव. कदाचित हेच कारण होते, जिथे घरातील दिवा विझलेला बघून अनेक जण अस्वस्थ होत होते पण नितीका पहाडासारखी आपल्या पायावर उभी होती. अखेरच्या वेळी नितीका आपल्या पतीजवळ उभी होती आणि त्यांच्याकडे अशा नजरेने बघत की, जणू ती इशाऱ्याने बोलत आहे आणि मेजर ही सगळे समजू शकत आहेत.

यानंतर पती बद्दल बोलता बोलता देशासाठी जय हिंद बोलली आणि पूर्ण देश जय हिंदच्या नाऱ्याने दुमून गेला. देशासमोर प्रेम व्यक्त केल्यानंतर तिने ओरडून आय लव्ह यु म्हटलं आणि जगाला दाखवलं की, आपण पतीवर किती प्रेम करतो. खूप हिंमत लागते, आपल्यावर प्रेम करणार कुणी अस हरवायला. म्हणून तर म्हणतात की, जितके महान आपले सैनिक असतात त्याहून अधिक महान त्यांचे कुटुंब असते. ज्यांच्या सोबत असे घडूनही त्यांचे देशाप्रती प्रेम तुसभरही कमी होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *