मोदींचा हा आहे बदला घेण्याचा मास्टर प्लान ,सगळ्यांसमोर केला हा खुलासा बघा .

पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्या नंतर पीएम मोदींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी सेनेला कारवाई करण्याची पूर्ण सूट देऊन दिली आहे. मोदींनी एका रॅलीमध्ये म्हटले की, ‘सुरक्षबलांना पुढची कारवाई करण्यासाठी, वेळ काय असावी, स्थान काय असावे, स्वरूप काय असावे, हे ठरवण्याची पूर्ण सूट देण्यात येत आहे. मोदींचे हे बोलणे ऐकून रॅलीमधील लोकांनी, ‘भारत माता की जय’ चे नारे दिले.

तेच हल्ल्याच्या 19 तासानंतर CRPF ने ट्विट केले की, ‘आम्ही हा हल्ला विसरणार नाही, आणि माफ ही करणार नाही’. आम्ही आमच्या शहीद साथीदारांना सलाम करतो. आम्ही शहीदांच्या कुटुंबासोबत उभे आहोत. या भ्याड हल्ल्याचा बदला नक्कीच घेतला जाणार. ट्विटच्या आधी मोदींनी चेतावणी दिलेली की, हिंदुस्थान या हल्ल्याचे सडेतोड उत्तर देणार.

हल्ल्या नंतर मोदी सरकारच्या दहा मोठ्या गोष्टी : – 

1.एजन्सीना माहिती द्यावी : मोदींनी सांगितले की, आमच्या सुरक्षबलांना पूर्ण सूट देण्यात आली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, देशभक्तीच्या रंगात रंगलेले लोक योग्य माहिती एजन्सी पर्यंत पोहचवतील. जेणेकरून आपली लढाई अधिक मजबूत होईल.

2.काही करून दाखवण्याची भावना : पुलवामा आतंकवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले की, या हल्ल्या नंतर लोकांमध्ये जो राग- आक्रोश आहे तो मी चांगला समजू शकतो. यावेळी देशाची जी अपेक्षा आहे ती काही करून दाखवण्याची भावना आहे आणि ती स्वाभाविक आहे.

3.आतंकवाद्यांना मोठी चूक केली : मोदींनी म्हटले की, ‘मी सांगू इच्छितो की, पाक आतांकी आणि त्याचा समर्थकांनी मोठी चूक केली आहे. याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे तुम्हाला.’

4.देशाला दिला विश्वास : मोदींनी देशाला विश्वास दिला की, या हल्ल्यामागे जी ताकद आहे, जे गुन्हेगार आहेत, त्यांना त्यांच्या कर्माची फळ भोगावी लागणार.

5.जगात देशाचा एकच आवाज ऐकू गेला पाहिजे : मोदी म्हणाले की, जे आमची अलोचना करत आहेत त्यांच्या भावनांचा आदर करतो. मी त्यांच्या भावना समजू शकतो. पक्ष-विपक्ष या राजनीती पासून लोकांनी दूर राहावे. देश हल्ल्याच्या एकजूट होऊन मुकाबला करतोय. देशाचा एकच आवाज पूर्ण जगात ऐकू गेला पाहिजे. कारण आपण लढाई जिंकण्यासाठी लढत आहोत.

6.पाकिस्तानचे मंसूबे पूर्ण नाही होणार : मोदी पुढे म्हणाले की, पूर्णपणे वेगळा पडलेला पाकिस्तान आतंकवादी गतीविधींनी भारताला अस्थिर करून आपले स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करत असेल तर, त्याने तो विचार करणे सोडून द्यावे. शेजारींना वाटत की, ते ताबाही करून भारतात अशांतात पसरवतील पण त्यांचे हे मंसूबे कधीच पूर्ण होणार नाहीत.

7.ज्याने द्वेष पसरवला तो मिटला : मोदींनी सांगितले की, वेळेने सिद्ध केले आहे की, ज्यांनी द्वेष पसरवला ते कायमचे मिटले. अशा प्रत्येक हल्ल्याचे सडेतोड उत्तर भारत देईल.

8.नाही टिकणार आतंकवाद : अनेक मोठ्या देशांनी या हल्ल्याची निंदा केली. भारतासोबत उभे राहून समर्थन देण्याची भावना व्यक्त केली. मी सगळ्यांना आवाहन करतो की, आतंकवाद विरोधात मानवतावादी शक्तींना लढावे लागणार. आपल्याला आतंकवादाला पराजित करावे लागणार. जेव्हा सगळे देश एक मार्ग, एक आवाज आणि एक दिशेने चालतील तेव्हा आतंकवाद टिकू नाही शकणार.

व्हिडीओ :-

दोन मिनिटांचे मौन : मोदींनी जवानांसाठी दोन मिनिटांचे मौन राखले. त्यानंतर त्यांनी वंदे मातरम एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला.सरकारने पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेव्हरेट नॅशनचा दर्जा परत घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *