एम्बुलन्स च्या गाडीवर AMBULANCE शब्द हा उल्टा का लिहलेला असतो ? जाणून घ्या याचे कारण ..

रुग्णवाहिकेचे महत्व आणि गरज तर आपण सगळेच जाणतो. जी आपत्कालीन वैद्यकीय सेवा देऊन रुग्णाचे प्राण वाचवते. जेव्हा पण आपण रस्त्यावर रुग्णवाहिका जाताना बघतो तेव्हा रुग्णाच्या गंभीर अवस्थेच्या विचाराने मनात भीती वाटते. लोक शक्य होईल तसे रस्त्यावर रुग्णवाहिकाला मार्ग करून देतात आणि प्रार्थना करतात की त्या व्यक्तीचे प्राण वाचावे.

रस्त्यावर धावणारी ही गाडी अनेक प्रकारे लोकांचे लक्ष वेधून घेते, जेणेकरून तिला समोर जाण्यास मार्ग मिळेल. काही असेच विशेष म्हणजे रुग्णवाहिकेवर AMBULANCE हा शब्द उलटा लिहिलेला असतो. पण अधिकतर लोकाना त्याचे कारण माहीत नाही. आज आम्ही सांगू त्यामागील विशेष कारण.

रुग्णवाहिकेच्या समोर इंग्रजी भाषेत उलटे AMBULANCE असे लिहिलेले असते. यामागील उद्देश असा की, समोर असलेल्या गाडीच्या चालकाला मागून येणाऱ्या गाडीचे अक्षर स्पष्टपणे दिसून यायला हवेत. कारण गाडीच्या आरशात शब्द उलटे दिसतात, म्हणून उलटे अक्षर लिहिलेले जातात म्हणजे ते समोरच्याला सरळ दिसतील. ते पटकन वाचून मागून येणाऱ्या रुग्णवाहिकाला शक्य तितका लवकर मार्ग देता येईल.

लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केले जातात विशेष उपाय :- या विशेष गोष्टीसोबतच रुग्णवाहिकाकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी इतरही अनेक प्रयोग केले जातात. जसे की, इलेक्ट्रॉनिक सायरन, फ्लैशिंग लाइट, स्पीकर, रेडियों फोन आणि इतर उपकरण असतात. जेणेकरून रस्त्यावर लोक तिला मार्ग देऊ शकतील.

सुरुवातीला फक्त घंटी वाजवून रुग्णवाहिका चालवली जायची नंतर सायरनचा वापर केला जाऊ लागला जे हवेच्या दाबावर चालायचे. आज सगळ्यात प्रसिद्ध ह्वेलेन इलेक्ट्रॉनिक सायरन वापरले जाते.

भडक रंग लक्ष वेधून घेतात :- 

रुग्णवाहिका इतर गाड्यांपेक्षा वेगळी ठेवण्याचा एक स्पष्ट उद्देश असतो. तो म्हणजे, लोक लगेच ओळखू शकतील आणि गाडीला रस्ता करून देतील. रुग्णवाहिका वेगळी दिसण्यासाठी तिला चमकदार रंगानी आकर्षिक केले जाते.

जरुरी नाही की, तो रंग निळा आणि हिरवाच असावा. पिवळ्या, हिरव्या, नारंगी आणि इतरही दुसऱ्या रंगाच्या रुग्णवाहिका जगभरात चालतात. यांचा उद्देशही तोच असतो की, लोकांनी लवकर ओळखावं आणि रस्ता द्यावा.

माहितीसाठी, रुग्णवाहिका फक्त मोटारगाडीतच नसतात. तर त्या विमान, हेलिकॉप्टर पासून जहाज, घोडागाडी, दुचाकी आणि सायकल मध्येही असतात. माहिती आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि आमुचे पेज आवश्य लाईक करा .धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *