मजुराची मुलगी सासरी निघाली हेलीकॉप्टरने,पण जाता -जाता बोलली असे काही जे एकूण भावुक झाले सारे लोक ..

हिसार मध्ये एक गरीब परिवतील मुलगी लग्नानंतर नवरी बनून आपल्या सासरी हेलिकॉप्टरने विदा झाली. हा सध्या त्या भागात चर्चेचा विषय बनला आहे. रिपोर्टनुसार हिसारचा राहणाऱ्या संजयने संतोषी नामक मुलीशी एक रुपया हुंडा घेऊन लग्न केले. एकीकडे देशात हुंडा एक समस्या बनली असताना दुसरीकडे या मुलाने असे केल्याने सगळीकडे त्याची स्तुती केली जाते आहे. इतकंच नाही तर फक्त एक रुपया हुंडा घेणाऱ्या संजयने आपल्या नवरीची विदाई हेलिकॉप्टरने केली.

मुलीला ओझं समजू नका, म्हणून हुंडा घेतला नाही. :- जेव्हा याबद्दल संजयचे वडील सतबीर यांना विचारले की, आपण आपल्या मुलाचे लग्न हुंडा न घेता का केले आणि यातून आपणाला लोकांना काय संदेश द्यायचा आहे ? त्यावर ते म्हणाले की, मुलगी वाचवा हा संदेश द्यायचा होता. त्यांचं म्हणणं आहे की, लोकांनी मुलीला ओझे समजू नये. या अनोख्या लग्नाची चर्चा फक्त त्या गावात नाहीतर आजूबाजूच्या गावातले लोक ही लग्न बघायला आलेले. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावात असे पहिल्यांदाच झाले की, कुणी हुंडा न घेता लग्न केले आणि नवरीची विदाई हेलिकॉप्टर मधून झाली.

मुलाच्या वडिलांनी ठेवली होती ही अट :- 

बातमीनुसार संजयचे वडील सतबीर यांनी मुलीच्या वडिलांना आधीच सांगितले होते की ते हुंडा घेणार नाहीत. मुलगी गरीब घरातील असल्याने तिचे नातेवाईक या गोष्टीने आनंदीत होते. सतबीर यांना एकुलता एक मुलगा आहे ज्याचे लग्न त्यांनी हुंडा न घेता केलेले.

इतकंच नाही तर त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाला हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आणि आपल्या सुनेची विदाई हेलिकॉप्टरने केलेली. नवरीचे नाव संतोषी आहे आणि बीए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. मुलाबद्दल बोलायचे तर संजय सध्या बीए फायनल करतो आहे. हेलिकॉप्टर 10 फेब्रुवारीला सकाळी जवळपास 11:30 वाजता हसनगढ गावात उतरले.

भावुक झालेले मुलीचे वडील म्हणाले, असा कधी विचारही केला नव्हता. :- 

संतोषीचे वडील मजदूर आहेत आणि त्यांना तीन अपत्ये आहेत. संतोषी त्यातील सगळ्यात मोठी जिच्या लग्नाने खूप आनंदीत होते. ते म्हणाले देवाची कृपा आणि मुलीचे भाग्य आहे जे तिची हेलिकॉप्टर मधून विदाई होत आहे.

मुलीची हेलिकॉप्टरने विदाई बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांची भिड जमा झाली होती. ही पहिलीच वेळ होती की, गावातील मुलगी हेलिकॉप्टरने विदा होत होती. मुलीची हेलिकॉप्टरने विदा होण्याची बातमी कळताच आजूबाजूचे लोक तिथे एकत्र आले.

सकाळी नवरीच्या विदाई वेळी नातेवाईकांचे डोळे पाणावलेले आणि जेव्हा संतोषी निघायला हेलिकॉप्टर मध्ये बसली तेव्हा लोक हात हलवत नवरदेव नवरीला विदा करत होते.

विदाई वेळी नवरी संतोषी पण फार भावुक झालेली आणि ती म्हणाली, “मी तर स्वप्नातही विचार केला नव्हता की, माझ्याशी लग्न करणारा हेलिकॉप्टर मधून येईल. न मागताच देवाने मला सगळे सुख दिले.” आई वडील आणि गावातील लोकांची मला कायम आठवण येईल, हे ऐकून गावकरी लोकही भावुक झाले. मित्रांनो असेच सुंदर लेख वाचण्यासाठी आमुचे पेज नक्की लाईक करा .आणि लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *